28 February 2021

News Flash

Photo : सोनाली बेंद्रेने शेअर केला फिटनेस फंडा

पाहा, फिट राहण्यासाठी सोनाली नेमकं काय करते

बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला अनेक अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र या अभिनेत्रींच्या गर्दीत अजूनही ९० च्या दशकातील काही अभिनेत्री त्यांचं स्थान भक्कम ठेवून आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याने सोनालीने अनेकांना घायाळ केलं आहे. कर्करोगासारख्या आजारावर मात केल्यानंतर सोनाली आता तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.

सोनाली बऱ्याच वेळ इन्स्टाग्रामवर तिचे फिटनेसचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती योगासन करताना दिसत आहे. सकाळी कोवळ्या उन्हाचा आनंद घेताना, असं कॅप्शन सोनालीने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Zen Thank you @satva_india for the most comfortable yoga wear. @suparna_mehra @sameermehra

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on


दरम्यान, लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये सोनालीचा आवर्जुन उल्लेख केला जातो. आजवरच्या कारकिर्दीत सोनालीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामधील ‘हम साथ साथ हैं’, ‘सरफरोश’ या सारख्या अनेक चित्रपटामध्ये ती झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 4:04 pm

Web Title: sonali bendre shares glimpses of her morning routine dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘माझ्या एलिमिनेशनसाठी सिद्धार्थ जबाबदार’; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
2 बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण; शोविक चक्रवर्तीच्या कोठडीत वाढ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
3 ‘लॉकडाउन कमी होतोय पण करोना संपलेला नाही’; मोदींच्या विचारांना दिग्दर्शकाचा पाठिंबा
Just Now!
X