26 February 2021

News Flash

Photo : नववर्षाच्या पूर्वसंध्येला सोनाली बेंद्रेची प्रेरणादायी पोस्ट

कर्करोगावरील उपचारासाठी गेल्या काही महिन्यांपासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये आहे.

सोनाली बेंद्रे

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. २०१८ या वर्षाच्या चांगल्या आठवणी मनात साठवून आणि वाईट गोष्टींना मागे सोडून एक नवीन सुरुवात करण्याचा मानस अनेकजण करत आहेत. अशातच कॅन्सरशी झुंज देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

केस कापण्यापूर्वीचा फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं, ‘केस कापण्यापूर्वीचा माझा हा फोटो. आता माझे केस हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये मी पुन्हा अशी दिसू शकते. इथपर्यंतच्या प्रवासाने मला खूप शिकवलंय. कॅन्सरशी लढा देण्याच्या शरीराच्या इच्छाशक्तीपासून ते या काळात माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक गोष्टीने मला आयुष्याच्या अस्थिरतेची शिकवण दिली आहे. गोष्टी येतात आणि जातात हे शिकवलंय (माझ्या केसांप्रमाणेच). नवीन वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी जाईल अशी आशा करते.’

वाचा : ‘या’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एण्ट्री

कर्करोगावरील उपचारासाठी गेल्या काही महिन्यांपासून सोनाली न्यूयॉर्कमध्ये आहे. सोनालीची तब्येत आता ठीक असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. न चुकता नियमितपणे सोनालीचं चेकअप सुरु असतं, असं सोनालीच्या पतीने गोल्डी बहलने सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 5:24 pm

Web Title: sonali bendre shares words of worth as she looks forward to 2019
Next Stories
1 ‘या’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची एण्ट्री
2 ‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले!’
3 Bigg Boss 12 : ‘खोट्या शोची खोटी विजेती’; श्रीसंतची मॅनेजर दीपिका कक्करवर चिडली
Just Now!
X