21 April 2019

News Flash

….तरीही मनापासून मी दिवाळी साजरी केली!

रोजचेच कपडे घातले. छोटीशी पूजा केली पण, तरीही जे काही केलं ते पूर्ण मनापासून केलं असं म्हणत न्यूयॉर्कमधल्या दिवाळीचा फोटो तिनं शेअर केला आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून उपचारांमुळे ती अमेरिकेत वास्तव्य करत आहे. एकीकडे सगळेच आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत दिवाळी साजरी करत आहे मात्र आपण घरापासून दूर दिवाळी साजरी करतोय हे अत्यंत वेदनादायी असल्याची खंत तिनं बोलून दाखवली.

सोनालीनं इन्स्टाग्रामवर न्यूयॉर्कमधल्या दिवाळीचा फोटो शेअर केला आहे. इथे मुंबईपेक्षा खूप उशीरा दिवाळी साजरी होते म्हणूनच मी उशीरा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. यंदाची दिवाळी मी पारंपरिक पद्धतीनं साजरी केली नाही. इथे भारतीय पद्धीतीचे पारंपरिक कपडे माझ्याकडे नाही, त्यामुळे रोजचेच कपडे घातले. छोटीशी पूजा केली पण, तरीही जे काही केलं ते पूर्ण मनापासून केलं असं म्हणत तिनं पती आणि छोट्या मुलासोबत फोटो शेअर केला आहे. तसेच सुख समुद्धी आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छाही सोनालीनं आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत.

नुकतीच अभिनेत्री नम्राता शिरोडकर हिनं सोनालीची भेट घेतली. तसेच तिची प्रकृती सुधारत असून ती लवकरच मुंबईत परतेल असा विश्वास तिनं चाहत्यांना दिल्या. जुलै महिन्यात सोनालीला कॅन्सरचं निदान झालं होतं.

First Published on November 8, 2018 12:57 pm

Web Title: sonali bendre unconventional diwali in new york