अभिनेत्री सोनाली खरे २०१४ मध्ये ‘बे दुणे दहा’ या टिव्ही मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर तिने ‘७, रोशन व्हिला’, ‘हृदयांतर’, सिनेमांमध्ये काम केलं. सोनाली आता दस-याच्या मुहूर्तावर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करतेय. कलर्स मराठीवरच्या ‘आज काय स्पेशल’ या कुकिंगविषयक शोमध्ये सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत ती दिसणार आहे.

आपल्या कमबॅकविषयी सोनाली खरे म्हणते, “मला आनंद आहे की, मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या टीव्ही क्षेत्रात परततेय. स्वयंपाक करणं, कोणत्याही गृहिणीला नवीन नाही आणि मला पहिल्यापासूनच बेकिंगची आवड होती. पण लॉकडाउनमध्ये मी भरपूर नव्या रेसिपी शिकले. त्यामुळे जणू या शोची रंगीत तालिम झाली होती. त्यात मला माझ्या काही पूर्वीच्या सहकलाकारांसोबतही या शोमुळे स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे, ह्याचा एक वेगळाच आनंद आहे.”

Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

सोनालीने ह्याअगोदर ‘कॉलेज माझी जान’, ‘गमंतगढ’, ‘आम्ही सारे खवय्ये’, अशा टेलिव्हिजन शोजचे सुत्रसंचालन केले होते. आता सोनालीच्या चाहत्यांना दस-यापासून तिला टेलिव्हिजनवर पुन्हा पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

ह्या शोची खासियत सांगताना सोनाली म्हणते, “इतर कुकिंगविषयीच्या शोमध्ये फक्त येणारे पाहुणेच रेसिपी दाखवतात. पण इथे मात्र मीही काही पदार्थ बनवणार आहे. योगाभ्यांसामुळे शिकलेल्या काही टिप्स आणि काही किचन टिप्सही मी शेअर करणार आहे. आलेल्या पाहुण्यांसोबत माझ्या कुकिंगविषयीच्या गप्पा रंगणार आहेत. काही फुड रिलेटेड खेळही असतील. जे प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजक वाटतील.”

‘न्यू नॉर्मल’मध्ये शुटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल सोनाली म्हणते, “सतत मास्क घालण्याची सवय नसते. त्यामुळे पूर्णवेळ मास्क घालून शूटिंगस्थळी राहणं, हे थोडं दमछाक करणारं असलं, तरीही आपल्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे. स्वादिष्ट जेवण बनवण्याची पहिली पायरी ही स्वच्छता आहे. त्यामुळे सेटवरचं वातावरणं तसंच असतं, ह्याचा मला आनंद आहे.”