News Flash

मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिचे अनेक चाहते आहेत. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिने नुकताच एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तिची मुलगी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

सोनाली ही सोशल मीडियावर मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करत असते. नुकताच तिने तिची मुलगी सनाया अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे. सनाया एका शॉर्ट फिल्ममध्ये भूमिका साकारणार आहे. तिची ही शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनायाच्या शॉर्ट फिल्मचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहता या शॉर्ट फिल्मचे नाव ‘ब्लड रिलेशन’ असल्याचे समोर आले आहे. ‘येत्या दिवाळीत ब्लड रिलेशन ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित होणार आहे. या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन सई देवधरने केले आहे’ असे कॅप्शन सोनालीने दिले आहे.

सोनालीची मुलगी सनाया ‘ब्लड रिलेशन’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत. सध्या सोनाली ही कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आज काय स्पेशल’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शोच्या माध्यमातून जवळपास आठ वर्षानंतर सोनालीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 4:42 pm

Web Title: sonali khare daughter alasha acting debut avb 95
Next Stories
1 ‘छकुला’नंतर पुन्हा एकत्र येणार बाप-लेकाची जोडी; ‘झपाटलेला ३’मध्ये झळकणार आदिनाथ- महेश कोठारे?
2 पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच नाही करू शकत – अपूर्वा नेमळेकर
3 आदित्यच्या घरी लगीनघाई! पार पडला रोका समारंभ
Just Now!
X