हिरकणी सिनेमानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणखी एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा मोठ्या कौशल्यानं सांभाळत मुघलांशी दोन हात करणाऱ्या छत्रपती ताराराणींच्या शौर्याची गाथा सांगणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘छत्रपती ताराराणी’ असं या सिनेमाचं नावं असून सोनाली कुलकर्णी या सिनेमात छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करत सोनालीनं सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाच्या पहिल्या मोशन पोस्टरमध्ये सोनालीचा तडफदार अंदाज पाहायला मिळतोय.

डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चरित्रग्रंथावर आधारित हा सिनेमा असून राहुल जाधव या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. डॉ. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लिहले असून अवधूत गप्ते यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे.

What Aditya Thackeray Said?
“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

शिवाजी महाराजांचे पुत्र महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी आणि हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजे छत्रपती ताराराणी. कोल्हापूरच्या संस्थापिका असलेल्या महाराणी ताराराणी अत्यंत बुद्धीवान, तडफदार होत्या. छत्रपती ताराराणी राजकारण आणि युद्ध कौशल्यातही तरबेज होत्या. महाराणी ताराराणी मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होत्या. महाराज राजाराम यांच्या निधनानंतर महाराणी ताराराणी यांनी मोठ्या धैर्यानं मोगलांना सळो की पळो करून सोडलं. याच महान रणरागिणीची विजयगाथा उलगडण्याचा प्रयत्न ‘छत्रपती ताराराणी’ या सिनेमातून करण्यात येणार आहे. “छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.” अशी भावना सोनालीने व्यक्त केली आहे.

त्याचसोबत आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तुत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल,या जबाबदारी ची जाणिव असल्याचं सोनाली म्हणाली आहे.

महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो,आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना असं म्हणत ‘छत्रपती ताराराणी’ या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सोनालीने सिनेमाचं पोस्टर शेअर करताच अनेक मराठी सेलिब्रिटींनी सिनेमासाठी सोनालीला शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता खानविलकर, प्रसाद ओक, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह अनेक बड्या कलाकारांनी सोनालीचं कौतुक केलं आहे.