अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या चतुरस्त्र अभिनयामुळे प्रेक्षकांची वाहवा नेहमीच मिळवत असते. आतापर्यंत आपण सोनालीला अनेक वेगवगेळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. प्रत्येकवेळा प्रेक्षकांना नवं काही तरी देण्यासाठी ती तत्पर असते. आता ती अजून एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. पण तुम्ही म्हणाल की वेगळी भूमिका म्हणजे आता तिचा कोणता नवीन सिनेमा येतो आहे का? त्या सिनेमाचं नाव काय? कथा कशावर आहे? पण तिचा नवीन सिनेमा येईल तेव्हा येईल पण सध्या आम्ही तिच्या कोणत्याही सिनेमाबद्दल बोलत नाही. सोनाली नव्या भूमिकेत आली म्हणजे ती डिझायनर झाली आहे.
नुकतीच सोनालीने एक झक्कास साडी डिझाइन केली आहे. या साडीमध्ये ती फारच सुंदर दिसते आहे. स्वत: डिझाइन केलेल्या नेटेड साडीचा फोटो सोनालीने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांकडून अनेक लाइक्सही मिळत आहेत. सोनाली उत्तम अभिनेत्री आहेच परंतू ती चांगली डिझायनर देखील असल्याचे आता समोर आले आहे. सोनालीच्या या नव्याने कळलेल्या कलेबद्दल जाणून तिचे चाहते तर नक्कीच खूश होतील. पण डिझायनिंग हा काही तिचा व्यवसाय नाही. ही अशी गोष्ट आहे जी ती जोपासते. त्यामुळे भविष्यात जर सोनालीने काही सिनेमांसाठी डिझायनर म्हणून काम केलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आपल्या अभिनयानेच प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालणार की या क्षेत्रामध्येही आपल्या नावाची मोहर उमटवणार हे तर फक्त सोनालीच सांगू शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 8:21 pm
Web Title: sonali kulkarni becomes fashion designerCopyright © 2021 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.