18 January 2021

News Flash

सोनाली सामना पहायला गेली अन् मीम्समध्ये चमकली; पाहा व्हायरल मीम्स

हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

विश्षचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना चांगलाच रंगला होता. भारताने २८ धावांनी हा सामना जिंकला. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये अनेक तरूण, आबालवृद्ध आणि कलाकार पोहोचले होते. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील इंग्लंडला पोहोचली होती. सामन्यादरम्यान सोनालीच्या हावभावावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

त्याच दिवशी पावसाने मुंबईसह इतर शहरांना झोडपून काढले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी सोनालीवर अनेक मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स दुसरे तिसरे कुणी शेअर केले नसून खुद्द सोनालीने शेअर केले आहेत. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे हे मीम्स शेअर केले आहेत. ‘ओव्हर अॅक्टिंगचे ५० रुपये कट, हा पावसाचा पहिला हफ्ता आहे, दुसरा गणेश उत्सवात आणि तिसरा दिवळीमध्ये’ असे अनेक मीम्स तयार करण्यात आले आहेत.

 

सध्या सोनालीचे हे मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दरम्यान भारताला पाठिंबा दर्शवण्यासाठी इंग्लंडच्या कानाकोपऱ्यातून भारतीय चाहते मैदानामध्ये हजर असतात. आत्तापर्यंत भारताला इंग्लंडमध्ये होम ग्राऊण्ड असल्यासारखाच पाठिंबा मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 1:14 pm

Web Title: sonali kulkarni memes are viral on internet avb 95
Next Stories
1 ऋषभ पंतची जागा बदलू नका, क्लार्कचा टीम इंडियाला महत्वाचा सल्ला
2 VIDEO: ‘इंग्लंड किंवा न्यूझीलंड संघाने आत्महत्या केली तर पाकिस्तान उपांत्य फेरीत जाईल’
3 ‘GRANDMOTHER INDIA’: अमूलकडून विराटला आशीर्वाद देणाऱ्या आजींचा गौरव
Just Now!
X