News Flash

वाहतूक कोंडीत अडकलेल्या सोनालीच्या मदतीसाठी धावून आला खालीद

सोनालीने ट्टिवरवर फोटो शेअर केलाय

मुंबईत होणा-या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांना अनेकदा सामना करावा लागतो. या वाहतूक कोंडीत अनेकदा सेलिब्रेटीही अडकलेले पहायला मिळतात. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर अनेकदा सेलिब्रेटी लोकांची गर्दी होईल या भीतीने गाडीबाहेर येणं टाळतात. मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर दुचीकीस्वाराची मदत घेत सिद्धिविनायक मंदिर गाठलं. स्वत: सोनाली कुलकर्णीने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सोनाली कुलकर्णीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मला योगायोग आवडतात. मला गुलाबजामच्या टीमसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहचायचं होतं पण ट्राफिक जाममध्ये अडकले होते. कारमधून बाहेर येऊन मी लिफ्ट मागितली. खालिदचे आभार ज्याने मला त्याच्या बाइकवरुन सिद्धिविनायकला पोहोचवलं. खालिद तू अक्षरश: देवासारखा धावून आलास’.

Next Stories
1 कंगना आणि तिच्या भाच्याची मस्ती पाहिली का?
2 Shikari Trailer: ऐन उन्हाळ्यात ‘हिट’ वाढवणारा ‘शिकारी’ चित्रपटाचा ट्रेलर
3 सलमानला भेटण्यासाठी मुंबईत पळून आली १५ वर्षांची मुलगी
Just Now!
X