१९९४ साली विधू विनोद चोप्रा यांनी ‘१९४२ अ लवस्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. सामाजिक, राजकीय असंतोषाच्या वातावरणामध्ये खुलणाऱ्या एका प्रेमावर आधारित या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं होतं. विशेष म्हणजे  या चित्रपटातील प्रत्येक गाणं गाजलं असून यातील ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणं आजही तरुणाईच्या ओठांवर गुनगुनताना दिसून येतं. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात, नव्या ढंगामध्ये येणार आहे. या नव्या चित्रपटाची तयारी सुरु झाली असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

विधू वनोद चोप्रा यांच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘सियाप्पा’ असं असून या चित्रपटामध्ये सोनम कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. ‘१९४२ .. ‘या चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि मनिषा कोइराला हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. मात्र या नव्या चित्रपटामध्ये अनिल कपूरच्या मुलीची म्हणजेच सोनमची वर्णी लागल्यामुळे ती हा अभिनय कसा पार पाडेल याकडे सा-यांच लक्ष वेधल आहे.


गेल्या वर्षभरापासून सोनम कपूरच्या नावावर अनेक चित्रपट आले असून तिचे प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरत आहे. त्यामुळे आगामी ‘सियाप्पा’ हा चित्रपटही बॉक्सऑफिसवर कमाल करेल असं एकंदरीत दिसून येत आहे. ‘सियाप्पा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरची सुरुवात ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या गाण्यापासून झाली आहे. त्यामुळे या टीझरला एख वेगळा लूक मिळाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर चित्रपटातील एकएक कलाकाराची एण्ट्री झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ‘सियाप्पा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शैली चोपडा धर यांनी उचलली असून या चित्रपटामध्ये सोनम कपूर, अनिल कपूर, राजकुमार राव आणि जुही चावला हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.