09 December 2019

News Flash

सोनम कपूर होतेय पती आनंदसोबत लंडनला शिफ्ट ?

मागच्या वर्षी मे महिन्यात सोनमने व्यावसायिक आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली.

सोनम , आनंद

सोनम कपूर सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. मुंबईची ही अभिनेत्री लवकरच लंडनला शिफ्ट होण्याच्या विचारात आहे असं दिसतंय. मागच्या वर्षी मे महिन्यात सोनमने व्यावसायिक आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, ‘सोनम कपूर मुंबईमधील तिचा फ्लॅट विकण्याच्या विचारात आहे. नॉटिंग हिलमध्ये घर घेण्याचा तिचा विचार आहे. लंडन-मुंबई असा तिचा प्रवास सुरूच असतो. मुंबईतील तिचा फ्लॅट धीरू भाई अंबानी शाळेजवळ आहे.’

View this post on Instagram

Day 3

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

२०१४ मध्ये आनंद आणि सोनम पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दिवसागणिक त्यांची मैत्री अधिकच दृढ झाली आणि साधारण महिनाभरातच आनंदने सोनमला प्रपोज केलं होतं. चार वर्षांचं रिलेशनशिप, कुटुंबियांची संमती आणि अनेकांचे शुभाशिर्वाद या साऱ्याच्या जोडीने अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांनी सहजीवनाला सुरुवात केली होती. सोनमला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा म्हणजेच बी- टाऊन सेलिब्रिटींचा उत्साहही ओसंडून वाहत होता.

सोनम आगामी ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

First Published on July 16, 2019 5:11 pm

Web Title: sonam kapoor anand ahuja london shift djj 97
Just Now!
X