News Flash

सोनम आणि राधिका बनल्या आयकॉन ऑफ इंडिया

सध्या या दोन्ही अभिनेत्री यशाच्या शिखरावर आहेत

बॉलिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर आणि ‘फोबिया’ फेम राधिका आपटे यांच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘दि ११ एडिशन ऑफ एशिया व्हिजन मुव्ही अ‍ॅवॉर्ड्स’ची घोषणा करण्यात आली. यात झक्कास अनिल कपूरची मुलगी सोनमला ‘आयकॉन ऑफ इंडिया अ‍ॅवॉर्ड’ जाहीर झाला आहे. भारतीय सिनेमातील योगदान आणि ‘नीरजा भनोत’ हिच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात प्रशंसनीय अभिनय केल्याबद्दल तिला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तिच्यासोबतच मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिलाही ‘पार्श्च्ड’,‘फोबिया’, ‘कबाली’ या नावाजलेल्या सिनेमांतील भूमिकेसाठी तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अभिनय क्षेत्रातील कलाकारांसाठी मानाचा आणि गौरवाचा मानला जाणारा हा दिमाखदार पुरस्कार सोहळा १८ नोव्हेंबर रोजी ‘शारजाह क्रिकेट स्टेडियम’ येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचा आपण एक भाग असल्याबद्दल सोनमला अभिमान वाटत असल्याचे तिने सांगितले. बॉलिवूड कलाकारांना हवाहवासा वाटणारा असा हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याने सोनम आणि राधिका सध्या जाम खुश आहेत. सोनम आणि राधिका या दोघीही सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. त्यामुळे सध्या दोघीही सोशल मीडियावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात व्यग्र आहेत.

बॉलिवूडमध्ये सोनम कपूरची ‘फॅशनिस्टा’ अशी ओळख आहे. पण यासोबतच परखड बोलणारी, ज्वलंत मुद्यावर हिरहिरीने मत मांडणारी म्हणूनही तिला ओळखले जाते. अनिल कपूरची मुलगी असली तरी काम मिळवण्यासाठी तिने कधीही वडिलांच्या नावाचा आधार घेतला नाही. अशा दोन्ही गुणी कलाकारांना लोकसत्ता ऑनलाइन टीमकडून हार्दिक अभिनंदन!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 3:35 pm

Web Title: sonam kapoor and radhika apte to bebestowed with icon of india award
Next Stories
1 ‘वजह तुम हो’च्या अभिनेत्रीचे चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत डेटींग?
2 आलियाला झाली होती वर्ग साफ करण्याची शिक्षा
3 रणबीरचे शाळेतील खोडकर रुप सर्वांसमोर उघड
Just Now!
X