30 September 2020

News Flash

प्रमोशनदरम्यान सोनम कपूरने दीपिकाला दिला ‘हा’ फॅशनचा सल्ला…

सोनमने सलमान खानला देखील सल्ला दिला आहे

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अभिनयाबरोबरच स्टनिंग फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे लूक नेहमीच चर्चेत असतात. नुकताच सोनम कपूरने बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोणला फॅशनशी संबंधीत एक सल्ला दिला आहे. सोनमने तिचा आगमी चित्रपट ‘जोया फॅक्टर’च्या प्रमोशन दरम्यान दीपिकाला हा सल्ला दिला आहे. पण हा सल्ला देताना सोनमने दीपिकाची प्रशंसादेखील केली आहे.

सोनमला एका मुलाखती दरम्यान बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता दबंग खान सलमान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना फॅशनचा सल्ला देण्यास सांगितला होता. त्यावर सोनम म्हणाली की दीपिकाची बॉडी खूप अमेझिंग आहे. तिने तिच्या बॉडीला साजेसे कपडे परिधान करावेत असा सल्ला दिला आहे. दरम्यान तिने सलमानने कधी टी-शर्ट घालू नये असे देखील म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘अंकिता के पापाजी है मिलिंद’ म्हणणाऱ्यांना मिलिंदचे मजेशीर उत्तर

‘कतरिना जशी आहे तशीच सर्वांसमोर स्वत:ला सादर करते. त्यामुळे मला ती आवडे आणि मी तिचा आदर ही करते. कतरिना फॅशन आयकॉन घोषीत करण्याच्या स्पर्धेत स्वत:ला कधीच पाहत नाही. ती जीन्स, टी-शर्ट आणि केसांचा पोनी या लूकमध्ये देखील सुंदर दिसते. पण काही लोक दर तीन महिन्यांनी वोगच्या कवर पेजवर येण्यासाठी प्रयत्न करत असतात’ असे सोनम म्हणाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 6:16 pm

Web Title: sonam kapoor give suggestion to deepika padukone avb 95
Next Stories
1 जॉनी डेपचा ‘या’ अभिनेत्रीवर मानसिक छळाचा आरोप
2 अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचं चित्रपटात पदार्पण
3 गेल्या सहा वर्षांपासून श्रद्धा कपूर भोगतेय ‘हा’ त्रास
Just Now!
X