सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘नीरजा’, ‘एक लाडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘संजू’, ‘वीरे दि वेडींग’, ‘पॅडमॅन’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. २००७ साली जेव्हा सोनमने तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली होती तेव्हा तिला अपयशाला सामोरे जावे लागले होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. परंतु, तिचा तिसरा चित्रपट ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ या चित्रपटामुळेच तिला यश मिळाले होते.
नऊ वर्षांपूर्वी ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ हा रोमँटिक विनोदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुनित मल्होत्रा लिखित दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली होती. या चित्रपटात सोनम कपूर, इम्रान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लव्ह स्टोरीज अजिबात न आवडणाऱ्या इम्रान खान म्हणजेच ‘जय’च्या प्रेमात सोनम कपूर पडते असे या चित्रपटाचे कथानक आहे.
धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाला नऊ वर्ष पूर्ण झाली याबाबत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सोनम आणि इम्रानचा फोटो त्यांनी शेअर केला असून ‘प्रेम हे अनपेक्षित असते. यामुळेच ते अमूल्य असते.’ असं कॅप्शन लिहिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 6:43 pm