06 March 2021

News Flash

कंगनावर विश्वास ठेवणं अवघड, सोनमच्या प्रतिक्रियेनंतर ‘क्वीन’चा राग अनावर

सोनमच्या उपरोधिक प्रतिक्रियेनंतर, तिला माझ्यावर विश्वास नाही आहे का? असा प्रश्न कंगनानं विचारला आहे.

आता बॉलिवूडमध्ये कंगना विरुद्ध सोनम अशा नवा वादाला सुरूवात झाली आहे.

बॉलिवूडमध्ये ‘नेपॉटिझम’ आहे. ही इण्डस्ट्री फक्त त्या मूठभर लोकांचीच आहे याचा अनुभव बॉलिवूडमध्ये ‘गॉडफादर’ नसलेल्या प्रत्येकाला येतच असतो. मात्र याविरोधात कंगना राणौतनं खुलेपणानं आवाज उठवला. नेपॉटिझमच नाही तर बॉलिवूडमध्ये नवख्या अभिनेत्रीसोबत केल्या जाणाऱ्या गैरवर्तणुकीवरही ती न घाबरता पुढे येऊन बोलली. फिल्ममेकर विकास बेहलवर एका तरूणीने छेडछाडीचा आरोप केल्यानंतर या महिलेच्या समर्थनार्थ बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना उभी राहिली आहे.

मात्र या प्रकरणात अभिनेत्री सोनम कपूर आहुजानं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे कंगानाचा राग मात्र अनावर झाला आहे. ‘कंगना बऱ्याच गोष्टीवर आपलं मतप्रदर्शन करते. पण कधी कधी त्या गोष्टी गांभीर्यानं घेणं किंवा त्यावर विश्वास ठेवणं अवघड जातं. पण तिचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच गोष्टी ती बोलते’ अशी प्रतिक्रिया सोनमनं ‘वोग वी द वुमन’ या परिषदेत दिली. या परिषदेत Metoo मोहिम, तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वाद, विकास बहल अशा वादांवर ती बोलत होती. मात्र या वादावर बोलताना तिनं दिलेली उपरोधिक प्रतिक्रिया कंगनाच्या जिव्हारी लागली.

त्यामुळे अशा उपरोधिक प्रतिक्रियेमुळे राग अनावर झालेल्या कंगनानं सोनमला चांगलाच टोला लगावला आहे. ‘मी Metoo मोहिमबद्दल बोलत आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मी व्यक्त होत आहे अशा वेळी माझ्याबद्दल चुकीचं मत तयार करण्याचा हक्क तिला कोणी दिला? तिला माझ्यावर विश्वास नाही आहे का? असा प्रश्न कंगनानं विचारला आहे. पण त्याचबरोबर सोनम कपूरला या क्षेत्रात ओळख तिच्या वडिलांमुळे मिळाली आहे मात्र मी यश मिळवण्यासाठी खस्ता खाल्ल्या आहेत आणि सर्वाधिक मेहनत केली आहे हे सांगायला कंगना विसरली नाही.

सोनम अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडची सदिच्छा दूत आहे. ती आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नेतृत्त्व करते, तिच्याकडून अशा व्यक्तव्यांची अपेक्षा नाही असंही कंगना म्हणाली. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये कंगना विरुद्ध सोनम अशा नवा वादाला सुरूवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 10:46 am

Web Title: sonam kapoor kangana ranaut war who gives her the right to judge me
Next Stories
1 #MeToo : विकास बहल प्रकरणात अनुराग कश्यपने ट्विटरवरुन मागितली माफी
2 अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटात या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी
3 जाणून घ्या, ‘तुला पाहते रे’ मालिकेतील गायत्री दातारविषयी
Just Now!
X