News Flash

Photo : बोल्ड अंदाजात सोनमने शेअर केले फोटो

या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन पुन्हा एकदा तिचा फॅशनसेन्स दिसून आला

सोनम कपूर

बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनम कपूर नेहमी तिच्या लूक्स आणि फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असते. सोनमचे अनेक चाहते तिला फॅशनच्याबाबतीत फॉलो करताना दिसतात. इतकंच नव्हे तर सोनम नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोनम तिचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच सोनमने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर सक्रिय असणाऱ्या सोनमने अलिकडेच बोल्ड फोटोशूट केलं असून त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिने परिधान केलेल्या कपड्यांवरुन पुन्हा एकदा तिचा फॅशनसेन्स पाहायला मिळाला.

पांढऱ्या आऊटफिटमध्ये सोनमचं सौंदर्य प्रचंड खुललं असून तिने या आऊटफिटला शोभेल अशी हेअर स्टाइलही केली आहे. तसंच तिने न्यूड मेकअपही केला आहे. दरम्यान, सोनम तिच्या फॅशन सेन्सबरोबरच स्पष्टवक्तेपणामुळेही चर्चेत असते. त्यामुळेच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफच्या चर्चा जास्त रंगत असतात. सोनम कायमच तिचं मत आणि मुद्दे स्पष्टपणे मांडत असते. तिच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे तिने कलाविश्वातील अनेकांवर निशाणा साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:24 pm

Web Title: sonam kapoor looks hot white dress sonam kapoor latest photoshoot ssj 93
Next Stories
1 अल्बम लॉन्च झाला, पण रानू मंडल सध्या करतात काय?
2 परिणीतीचं पहिलं ‘क्रश’ माहितीये का?
3 रितेश म्हणाला लव्ह यू; विद्या बालननं दिला भन्नाट रिप्लाय
Just Now!
X