News Flash

मुस्लीम आवडतात का?; वाचा सोनम काय म्हणाली..

यावर उत्तर देत सोनमने समस्त चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

सोनम कपूर

‘मला सर्वधर्मीय लोक आवडतात आणि हिच शिकवण हिंदू धर्म देतो’, असं वक्तव्य अभिनेत्री सोनम कपूरने केलं आहे. इन्स्टाग्रामचं नवीन फिचर नुकतंच लाँच झालं आणि या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना सोनमने हे वक्तव्य केलं. तुला मुस्लीम लोक आवडतात का असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला होता.

इन्स्टाग्रामवर एक नवीन फिचर सुरु करण्यात आलं असून या फिचरच्या माध्यमातून आपल्या आवडत्या चाहत्याला आता थेट प्रश्न विचारता येणार आहे. त्यामुळे चाहते आणि बॉलिवूड कलाकारांमधील अंतर कमी होणार असल्याचं दिसून येत आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून सोनम कपूरला तिच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांना उत्तर देतांना सोनमचं देशप्रेम दिसून आलं.
एका चाहत्याने सोनमला, ‘तुला मुस्लीम लोक आवडतात का?’ असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत सोनमने समस्त चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

‘मला माझा प्रत्येक चाहता प्रिय आहे. मग तो हिंदू असो किंवा मुस्लिम. याच चाहत्यांमुळे मी आज यशाचं शिखर सर करत आहे आणि माझ्यातील प्रेमभावना सुद्धा हिंदू धर्मामुळे जोपासली गेली आहे’, असं सोनम यावेळी म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘मला प्रत्येक धर्माविषयी आदर आणि प्रेम आहे. माझ्या मनात इतर धर्माविषयी जी भावना आहे ती माझ्या हिंदू धर्मातून आलेली आहे. हिंदू धर्म कायम चांगले उपदेश देत असून प्रेम,आदर यांची जोपासना करण्याचं शिकवतो’, असं सोनम म्हणाली.

दरम्यान, गेल्या वर्षी सोनमने हिंदू धर्माबद्दल भाष्य करणारा ब्लॉग लिहीला होता. ज्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली होती. मात्र यावेळी सोनमने केलेल्या वक्तव्यामुळे सोनमच्या मनात देशाबद्दल आणि हिंदूंबद्दलचं प्रेम दिसून येत आहे. बॉलिवूडच्या ‘खुबसूरत गर्ल’ ने ८ मे रोजी प्रियकर आनंद आहुजाबरोबर लग्नगाठ बांधली असून ती आता पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाली आहे. तिचा आगामी ‘एक लडकी को देखा तो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 11:42 am

Web Title: sonam kapoor loved muslims hit back hinduism
Next Stories
1 केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो -संजय दत्त
2 ‘२५ ते ३० कोटी कोणी प्रतिमा बदलण्यासाठी खर्च करत नाही!’
3 प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला सनीचा बायोपिक
Just Now!
X