News Flash

निकी मिनाजच्या ‘हॉट आउटफिट’वर सोनमची प्रतिक्रिया

निकीने अतिशय धाडसीपणे तिचे स्तन दिसेल, असा ड्रेस परिधान केलेला.

निकी मिनाज , सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूरची ओळख बॉलिवूडची स्टाइल आयकॉन अशी आहे. तिचे फॅशन स्टेटमेण्ट, ज्वेलरी आणि मेकअप हे सर्व अगदी परफेक्ट असते. तिच्या फॅशनची नेहमीच प्रशंसा केली जाते. महिलांच्या कपड्यांबाबतच्या निवड स्वातंत्र्यावर सोनमने नुकतेच आपले मत व्यक्त केले.  तिच्या वक्तव्यामुळे ती बरीच चर्चेतही आली होती. काही दिवसांपूर्वीच सोनमने लहानपणी तिचा विनयभंग झाल्याचा खुलासा करत त्यावर मोकळेपणाने चर्चाही केली होती. एखाद्या महिलेने तोकडे कपडे परिधान केल्यामुळेच तिला वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले, असे बरेचदा म्हटले जाते. पण, जेव्हा सोनमचा विनयभंग झाला होता तेव्हा तिने परिधान केलेल्या कपडयांचा काहीच दोष नव्हता, असे सोनमने म्हटले होते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सोनमने परिधान केलेल्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

दरम्यान, प्रसिद्ध गायिका निकी मिनाज ही तिच्या ड्रेसमुळे सध्या चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये निकीने काळ्या रंगाचा एकाच बाजूला स्लिव्ह असलेला ड्रेस परिधान केला होता. निकीने अतिशय धाडसीपणे तिचे स्तन दिसेल, असा ड्रेस परिधान केलेला. तिने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये शरीराचा एक भाग पूर्णपणे झाकलेला होता. तिच्या या ड्रेसबद्दल फॅशन दीवा सोनमला विचारले असता ती म्हणाली की, माझ्या शरीराबाबत मला आत्मविश्वास आहे. पण, तुम्ही जितकं कमी शरीरप्रदर्शन कराल तितक्याच अधिक खुलून दिसाल, असे मला वाटते. जर मी एखाद्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची निवड केली तर ते काळजीपूर्वक परिधान करणे गरजेचे आहे. मी नुकताच निकी मिनाजने परिधान केलेला ड्रेस पाहिला आणि अवाक् झाले. ती हॉट दिसत होती. पण, मी असा ड्रेस घालून कधीच सार्वजनिक ठिकाणी जाणार नाही.

नीरजा फेम सोनम सध्या दोन चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. आर बल्की यांचे दिग्दर्शन आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘पॅडमॅन’ आणि दुसरा चित्रपट म्हणजे ‘वीरे दी वेडिंग’. सोनमसोबत ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना कपूर आणि स्वरा भास्कर या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील. नुकतेच मध्य प्रदेश येथील महेश्वरमध्ये ‘पॅडमॅन’चे चित्रीकरण सुरु झाले आहे. अक्षय आणि राधिका आपटेने चित्रीकरणाला सुरुवात केली असून त्यांचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. पण, सोनमने बहुधा अद्याप या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 11:31 am

Web Title: sonam kapoor on nicki minajs hot outfit i will never put that much out there
Next Stories
1 Happy Birthday : ‘मेड इन इंडिया’ गर्ल अलिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
2 चित्ररंग : देखणी आणि शहाणी परीकथा
3 ग्लॅमगप्पा : अनुष्का मस्तीच्या मूडमध्ये
Just Now!
X