News Flash

मला रशियन, चीनी आणि फ्रेंच चित्रपट करायचे आहेत- सोनम कपूर

'स्क्रीप्ट चांगली असेल नक्कीच रशियन, चीनी आणि फ्रेंच चित्रपट करू'

सोनम कपूर

बॉलीवूडमधली स्टाईलीश आणि नेहमीच स्वत:च्या  वेशभूशेवर वेगवेगळे प्रयोग करायला न घाबरणारी अभिनेत्री सोनम कपूरला आणखी नवा प्रयोग करायचा आहे म्हणे. हा प्रयोग तिच्या वेशभूशेबाबतीत नक्कीच नाही आहे, तर ती आपल्या कामासोबत वेगळा प्रयोग करण्याच्या विचारत आहे.  तिला विविध भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. आपल्याला रशियन, चीनी आणि फ्रेंच भाषेत चित्रपट करायचे आहे असे तिने एका चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सांगितले. सध्या बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्री हॉलीवूड चित्रपट करण्याचा मागे आहे. आता दीपिकाचा ‘xxx’ हा हॉलीवूड चित्रपट पुढच्यावर्षी प्रदर्शित होत आहे तर तर दुसरीकडे ‘क्वांटीको’ या मालिकेतून प्रियांकाने देखील अमेरिकन प्रेक्षकांची मने आधिकच जिंकली असून तिचा ‘बेवॉच’ हा चित्रपट देखील लवकरच येणार आहे. पण सोनमला मात्र या दोघींपेक्षाही काहीतरी हटके करायचे आहे.

एका पंजाबी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनींगच्या वेळी सोनम कपूरने आपल्याला इंग्रजीबरोबर अनेक भाषांत चित्रपट करायला आवडेल असे सांगितले. हॉलीवूडमधल्या चित्रपटांत आतापर्यंत अनेकांनी काम केले असले तरी इतर भाषांतील चित्रपटांकडे क्वचितच कोणी वळतो त्यामुळे जर चित्रपटाची स्क्रीप्ट चांगली असेल तर आपण नक्कीच रशियन, चीनी आणि फ्रेंच चित्रपट करू असही सोनम म्हणाली. जर कथेतील एखादी भूमिका आवडली तर हिंदीच काय पण मराठी, पंजाबी भाषांतील चित्रपटात देखील आपण काम करू हेही सांगायला ती विसरली नाही.  सोनमचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट लवकरच येणार आहे या चित्रपटामध्ये ती करिना कपूरसह, स्वरा भास्कर सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 12:03 pm

Web Title: sonam kapoor open to doing russian chinese french films with good scripts
Next Stories
1 सदाबहार किशोर कुमार…
2 ‘बिग बीं’नी मानले चाहत्यांचे आभार..
3 छायाचित्रातील अक्षय कुमारसोबतच्या या मुलाला ओळखलंत का?
Just Now!
X