अभिनेत्री सोनम कपूर जवळपास एक वर्षानंतर लंडनहून भारतात परतलीय. जेव्हा ती मुंबई एअरपोर्टवर उतरली त्यावेळी तिला पिकअप करण्यासाठी वडील अनिल कपूर तिथे आधीच पोहोचले होते. एक वर्षानंतर वडिलांना पाहिल्यानंतर सोनम कपूर भावूक झाली आणि तिला रडू आवरलं नाही. बाप-लेकीच्या या भावनिक क्षणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरूय. तर दुसरीकडे आणखी एका नव्या चर्चांना उधाण आलंय ती म्हणजे सोनम कपूर प्रेग्नंट असल्याची…

मुंबई एअरपोर्टवरील सोनम कपूरचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. हे फोटोज आणि व्हिडीओ पाहून ती प्रेग्नंट असल्याचं दिसून येतंय. तर काही युजर्सनी तिच्या आउटफिटवरून तिला ट्रोल करण्यास सुरवात केलीय. यावेळी सोनम कपूरने स्कर्टवर निळ्या रंगाचं एक जॅकेट परिधान केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Sonam-Kapoor-Pregnant-photos
(Photo: Varinder Chawla)

या आउटफिवरून सोनम कपूर प्रेग्नंट असल्याचा अंदाज युजर्सनी लावलाय. एका फॅनने तिच्या फोटोवर कमेंट करत ‘ती प्रेग्नंट आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आणखी एका दुसऱ्या युजरने कमेंट केली, “असं वाटतंय ती प्रेग्नंट आहे…”. सोनम कपूरच्या फोटोवर प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना तिचे काही फॅन्स तिच्या समर्थनात उरतले आणि तिची बाजू मांडताना दिसून आले. “बऱ्याच दिवसानंतर सोनम कपूर तिच्या कुटुंबीयांशी भेटली आहे, कमीत कमी त्या भावनांचा तरी सन्मान करा”, अशा कमेंट्स करत तिच्या फॅन्सनी सोनमची बाजू सावरली.

तर काही युजर्सनी सोनम कपूरच्या आउटफिटवरून तिला ट्रोल करण्यात सुरवात केली. “केबिन क्रू मधून कपडे उधारीवर घेतले आहेत का, सोनमला झिरो फॅशन सेन्स आहे आणि ती स्वतःला फॅशन आयकॉन समजते”, अशा वेगवेगळ्या कमेंट्स मारा तिच्या फोटोंवर होताना दिसून येतोय.

सोनम कपूर गेल्याच वर्षी करोना काळात भारतातून लंडनला गेली होती. लंडना गेल्यानंतर ती तिथल्या अनेक गोष्टींचे फोटोज आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत होती. कधी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी तर कधी पतीसोबत रोमॅण्टिक डेट नाईट एन्जॉय करताना दिसून आली होती. ती शेअर करत असलेले सर्व फोटोज चाहत्यांना खूपच आवडत होते.

काही दिवसांपूर्वीच तिने पती आनंद आहूजासोबत एक फोटो शेअर भारताला मिस करत असल्याचं सांगितलं होतं. भारतात परतण्यासाठी ती खूप आतूर आहे आणि यासाठी ती खूप वाट पाहतेय असं देखील म्हटलं होतं. त्यानंतर कित्येक महिन्यांनी ती भारतात परतली आहे.