News Flash

सोनमसाठी ऐश्वर्याची गच्छंती

ऐश्वर्याच्या जागी आता सोनमची वर्णी लागली आहे.

गेले तीन वर्ष बॉलीवूड सुंदरी ऐश्वर्या  राय बच्चन ही कल्याण ज्वेलर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून कार्यरत होती. पण ऐश्वर्याच्या जागी आता सोनमची वर्णी लागली आहे.
स्टाइल दीवा सोनम कपूर यापुढे आता कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत झळकणार आहे. ऐश्वर्याची कल्याण ज्वेलर्समधून गच्छंती झाली असली तरी तिचे सासूसासरे अमिताभ आणि जया बच्चन हे यापुढेही याच्या जाहिरातीत झळकतील. गेले तीन वर्ष ऐश्वर्या कल्याण ज्वेलर्सची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. कल्याण ब्रॅण्डच्या उत्पादन वाढीमध्ये ऐश्वर्याचा मोलाचा वाटा राहिलाय, त्याकरिता आम्ही तिचे आभारी आहोत. आता आम्ही सोनमचे कल्याण ज्वेलर्समध्ये स्वागत करतोय. आम्हाला विश्वास आहे की, स्टाइल आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनममुळे नक्कीच हा ब्रॅण्ड आणखी लोकप्रिय होईल, असे कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन म्हणाले.
नागार्जुन, प्रभू शिवराज कुमार आणि मंजू वॉरियर हेदेखील कल्याण ज्वेलर्सचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 11:12 am

Web Title: sonam kapoor replaces aishwarya rai bachchan as kalyan jewellers brand ambassador
टॅग : Sonam Kapoor
Next Stories
1 पाहाः श्रद्धा आणि टायगर श्रॉफच्या ‘बागी’चा ट्रेलर
2 आईला तिचे जुने घर भेट देणार
3 माझ्याबाबत शंका उपस्थित करणारे लोक पक्षपाती- आमिर खान
Just Now!
X