News Flash

‘या’ कारणामुळे रिसेप्शनमध्ये आनंदने घातले स्पोर्ट्स शूज

आनंदला स्पोर्ट्स शूज, बास्केटबॉल आणि सोनम या तीन गोष्टी सर्वाधिक प्रिय असल्याचे बोलले जाते

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरू आहे असेच म्हणावे लागेल. सोनम आणि आनंदच्या लग्नानंतर नेहा धुपिया आणि अंगद बेदीने लग्न केले. यानंतर काहीच दिवसांनी गायक हिमेश रेशमियाचेही लग्न झाले. पण यासगळ्यात बॉलिवूडमध्ये सध्या सर्वात जास्त कोणत्या कपलच्या लग्नाची चर्चा झाली असेल तर ती म्हणजे सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाबद्दलचीच. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या लग्नाला आवर्जुन हजेरी लावली होती. शाहरुख, सलमान खानपासून रणवीर सिंग आणि रणबीर कपूरपर्यंत साऱ्यांनीच सोनमच्या रिसेप्शनमध्ये धम्माल केली. तिच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पण या मेगा पार्टीमध्ये एक अशी खटकणारी गोष्ट होती ज्याबद्दल नेटकऱ्यांनी सोनम आणि आनंदची खिल्लीही उडवली होती. आनंदने त्याच्या रिसेप्शनमध्ये शेरवानी घातली होती. पण या शेरवानीवर त्याने पारंपारिक चपलांऐवजी स्पोर्ट्स शूज घातले होते. याचमुळे तो सोशल मीडियावर ट्रोलही झाला होता. एकीकडे सोनम डिझायनर लेहंग्यात सुंदर दिसत होती तर दुसरीकडे आनंदचे शूज मात्र अपेक्षाभंग करत होते. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर आनंदने स्पोर्ट्स शूज का घातले होते याचे स्पष्टिकरण सोनमने दिले आहे.

सोनम हसत म्हणाली की, आनंदला माझी मस्करी करायची होती. याशिवाय अजून एक गोष्ट होती ती म्हणजे आनंदला पूर्ण दिवस फॉर्मल शूजमध्ये फिरायचे नव्हते. यामुळे रिसेप्शनला आनंदने त्याचे आवडते स्पोट्स शूज घातले होते. रिसेप्शन सुरू असताना माझ्या भावाने हर्षवर्धनने सांगितले की, बाहेर रेड कार्पेटची सोय केलेली आहे. तर तुम्ही दोघांनी प्रसारमाध्यमांसाठी काही फोटोशूट करा. पण तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की आनंदने शूज बदलले नाहीत. पण आनंद इंडस्ट्रीमधला नसल्यामुळे त्याला फारसा फरक पडला नाही. आनंदला स्पोर्ट्स शूज, बास्केटबॉल आणि सोनम या तीन गोष्टी सर्वाधिक प्रिय असल्याचे बोलले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 5:59 pm

Web Title: sonam kapoor reveals why anand ahuja wore sneakers during their marriage
Next Stories
1 माधुरीला का वाटते नाटकात काम करण्याची भीती?
2 Royal wedding : मुलीच्या लग्नात वडिलच राहणार अनुपस्थित
3 मालिकांबाबत प्रेक्षकांना नेमकं काय वाटतं
Just Now!
X