21 March 2019

News Flash

अशी सुरू आहे सोनम कपूरच्या लग्नाची तयारी

प्रियकर आनंद अहुजासोबत सोनम या महिन्याच्या अखेरीस विवाहबद्ध होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

सोनम कपूर, आनंद अहुजा

‘वीरे दी वेडिंग’ या आगामी चित्रपटासोबतच अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाचीही जोरदार तयारी सुरू असल्याचं कळतंय. प्रियकर आनंद अहुजासोबत सोनम या महिन्याच्या अखेरीस विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. मुंबईतल्या जुहू इथल्या तिच्या निवासस्थानी लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांची तयारी सुरू असल्याचं समजतंय.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनमचे वडील अनिल कपूर आणि आई सुनिता यांनी संगीत कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. या कार्यक्रमातील डान्स परफॉर्मन्सची कोरिओग्राफी फराह खान करणार आहे. सोनमच्या चित्रपटांतील बऱ्याच गाण्यांवर या संगीत कार्यक्रमात ठेका धरला जाणार आहे. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘धीरे धीरे से’ या गाण्यांचा समावेश असणार आहे. तर अनिल कपूर आणि सुनितासुद्धा सोनमसाठी स्पेशल सरप्राइज देणार आहेत.

वाचा : सुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

सोनम कपूरचा आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ चं शुटिंग पूर्ण झालं आहे. यानंतर ती लग्नाच्या तयारीला लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. तिनं स्वत: प्रसारमाध्यमांसमोर लग्नाबाबत अद्याप कोणतीच माहिती दिली नाही. पण, सध्याची लगबग आणि एकंदर माहोल पाहता प्रत्येकालाच सोनमच्या लग्नाबद्दल कुतूहल आहे.

First Published on April 16, 2018 5:58 pm

Web Title: sonam kapoor sangeet preparations on in full swing farah khan to choreograph