News Flash

अर्जुन कपूरसोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत सोनम म्हणाली, “आय मीस यू”

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनम कपूर सध्या पती आनंद आहूजासोबत लंडनमध्ये आहे. वर्षभर कुटुंबापासून दूर राहिल्यामुळे तिला कुटुंबाची आठवण येतेय. सोनम कपूर अनेकदा कुटुंबियांचे फोटो शेअर करत त्यांच्यासाठी सुंदर पोस्ट लिहत असते. नुकताच सोनमने अभिनेता अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतोय.

सोनम कपूर आणि अर्जुन कपूर हे चुलत भावंड असून दोघांमध्ये बहिण-भावाचं घट्ट नातं आहे. बराच काळ घरापासून आणि जवळच्या व्यक्तींपासून दूर राहिल्याने सोनमने ही पोस्ट केली आहे. सोनमने अर्जुन आणि तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत अर्जुनसाठी पोस्ट लिहली आहे. सोनमने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फॅनपेजवरील त्यांच्या बालपणाचा फोटो शेअर केला आहे.

sonam-kapoor-arhun-kapoor

सोनममने शेअर केलेल्या त्यांच्या बालपणीच्या फोटोत दोघं एका बाहुल्यासोबत खेळताना दिसत आहेत. या फोटोवर तिने “अर्जुन कपूर लव्ह यू आणि मिस यू” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे लंडनमध्ये असूनही सोनम अर्जुनला मिस करत असल्याचं दिसतंय. भारतात असताना अर्जुन कपूर आणि सोनम अनेकदा एकत्र वेळ घालवत धमाल करायचे.

‘या’ बॅण्डमध्ये सामील झाला सोनू सूद ; म्हणाला “लग्नासाठी त्वरित संपर्क साधा”

दरम्यान, अर्जुन कपूर नुकताच त्याच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाला आहे. तर त्याच्या ‘भूत पोलीस’ या हॉरर कॉमेडी सिनेमात शूटिंग त्याने नुकतच पूर्ण केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 7:13 pm

Web Title: sonam kapoor share childhood photo with arjun akpoor says i miss u kpw 89
Next Stories
1 “ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे”, भरत जाधवचं चाहत्यांना आवाहन
2 ‘मी तुमच्या विरोधात केस करेन’, हॉट फोटो पाहून म्हणणाऱ्याला हिना खानचे भन्नाट उत्तर
3 ‘टॉकीज मनोरंजन लीग’मध्ये येत्या रविवारी अ‍ॅक्शनचा धमाका
Just Now!
X