21 September 2020

News Flash

सोनम कपूरच्या बहिणीला मिळाली जीवे मारण्याची धमकी, इन्स्टाग्रामवर संतापून म्हणाली…

तिने सोशल मीडियद्वारे ही माहिती दिली आहे.

सध्या बॉलिवूडमधील कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच अनेकांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकताच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची छोटी बहिण रिया कपूरला इन्स्टाग्रामवर एका यूजरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोनमने यावर संताप व्यक्त करत इन्स्टाग्रामला त्या यूजरला ब्लॉक करण्यास सांगितले आहे.

नुकताच सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिने काही स्क्रिन शॉट शेअर केले आहेत. पहिल्या स्क्रिनशॉटमध्ये इन्स्टाग्रामने दिलेले उत्तर आहे. ‘कमेंट पाहिल्यावर आम्हाला जाणवले की यूजरने केलेली कमेंट ही आमच्या कम्यूनिटी गाइडलाइनच्या बाहेरील नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही चुकीचे बोलत आहोत तर कृपया पुन्हा रिपोर्ट करा. कारण इन्स्टाग्राम एक ग्लोबल कम्यूनिटी आहे. जर तुम्ही त्या यूजरला इन्स्टाग्रामवर पाहू इच्छित नाही तर त्याला अनफॉलो कर, म्यूट करा किंवा ब्लॉक करा’ असे इन्स्टाग्रामने म्हटले होते.

हा स्क्रिनशॉट शेअर करत सोनमने इन्स्टाग्रामला चांगलेच सुनावले आहे. ‘या यूजरला नक्की ब्लॉक करेन. पण तुम्ही अशा कम्यूनिटीला सुरक्षा देत आहात? इन्स्टाग्रामला वाटत नाही की जीवे मारण्याची धमकी देणारा त्यांच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. खरच इन्स्टाग्राम?’ असे सोनमने म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 7:58 pm

Web Title: sonam kapoor slams instagram after her sister rhea kapoor getting death threats avb 95
Next Stories
1 ‘त्यावेळी मी आत्महत्या करणार होतो, पण…’; मनोज वाजपेयीने सांगितला स्ट्रगलिंगचा अनुभव
2 ‘स्टूडंट ऑफ द इयर’चे ऑडिशन होता आयुष्यातील वाईट अनुभव, राधिका मदनचा खुलासा
3 ‘ऑस्कर’मध्येही घराणेशाही? हृतिक आणि आलियाला अ‍ॅकेडमी अवॉर्डचे आमंत्रण
Just Now!
X