News Flash

करिना पूर्ण करणार का सोनम कपूरची इच्छा ?

सोनमसोबतच करिनाच्या लाखो चाहत्यांचीही आहे हीच इच्छा

सोनम कपूर, करिना कपूर

सोशल मीडियामुळे आपल्या आवडत्या कलाकाराशी संवाद साधणं, त्यांचे अपडेट्स जाणून घेणं सोपं झालं आहे. यामुळे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. मात्र, असेही काही सेलिब्रिटी आहेत, जे अजूनही सोशल मीडियावर सक्रीय नाहीत. त्यांचे चाहते ट्विटर, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर त्यांच्या नावाने फॅन पेज अकाऊंट्स चालवतात. अशीच एक सेलिब्रिटी म्हणजे, करिना कपूर खान. करिनाच्या लाखो चाहत्यांची इच्छा आहे की सोशल मीडियावर तिने अधिकृत अकाऊंट सुरू करावेत. विशेष म्हणजे, अभिनेत्री सोनम कपूरलाही हेच वाटत असून बेबोनं इन्स्टाग्रामवर यावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं तिने सांगितलं.

सोनम कपूर सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सोनमचे नुकतेच ट्विटरवर एक कोटी दहा लाख फॉलोअर्स झाले आहेत. या निमित्ताने तिने ट्विटर चॅटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. आवडी-निवडींसोबत सोनमने तिच्या ‘टू डू लिस्ट’मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हेदेखील सांगितले. ‘वीरे दी वेडिंग’मधील तुझी सहकलाकार करिनाला इन्स्टाग्रामवर येण्यास सांगशिल का?’ असा प्रश्न एका चाहत्याने तिला ट्विटरवर विचारला. यावर होकार देत, तिला सोशल मीडियावर आणणं हे आपल्या ‘टू डू लिस्ट’मध्ये असल्याचं सोनमने सांगितलं. त्यामुळे करिनाने सोशल मीडियावर यावं ही चाहत्यांसोबतच सोनमचीही इच्छा आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता करिना ही इच्छा पूर्ण करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा : ‘या’ कारणामुळे बाथरूममध्ये होत होत्या आमिरच्या मिटींग्ज

शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचं शूटिंग दिल्लीनंतर बँकॉकमध्ये होणार आहे. एकता कपूर आणि सोनमची बहीण रीया कपूर निर्मित या चित्रपटात स्वरा भास्कर, शिखा तस्लानिया, सोनम कपूर आणि करिना कपूर या चारही अभिनेत्री स्क्रिन शेअर करताना दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 12:21 pm

Web Title: sonam kapoor to do list includes getting her veere di wedding co star kareena kapoor khan on instagram
Next Stories
1 आजचे ‘डुडल’ सितारा देवींना समर्पित
2 हिमेश रेशमिया पुन्हा विवाहबंधनात अडकणार?
3 ‘ये है मोहोब्बते’ फेम अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत
Just Now!
X