News Flash

लॉकडाउन काळात सोनम कपूर पोहचली लंडनमध्ये

सोशल मीडिया अकाऊंटवर दिली माहिती

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लंडनला पोहचली आहे. मार्च महिन्यात देशात पहिल्यांदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर सोनम आपला पती आनंद अहुजासोबत दिल्लीला गेली होती. ९ जून या आपल्या वाढदिवसाच्या आधी दोन दिवस सोनम पतीसोबत मुंबईला आली होती. त्यानंतर दोघेही मुंबईतच राहत होते.

सोनमने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लंडनमध्ये पोहचल्याचे छोटे व्हिडीओ टाकत, “London, I’m back… So beautiful”, अशी कॅप्शन दिली आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमने सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपण फिल्म शूटींग, मित्र-मैत्रिणी, क्रू यांना मिस करत असल्याचं सांगितलं होतं. अभिनेता दलकीर सलमानसोबत २०१९ साली चित्रीत झालेला ‘द झोया फॅक्टर’ हा सोनमचा अखेरचा चित्रपट होता. यानंतर लॉकडाउन काळात सर्व चित्रीकरण बंद पडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 7:58 pm

Web Title: sonam kapoor travels to london amid coronavirus pandemic psd 91
Next Stories
1 विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
2 बिग बॉस १४मध्ये होणार बदल, स्पर्धकांना मिळणार फोन वापरायला?
3 ‘प्रेम पॉयजन पंगा’मधील दोन कलाकारांनी सोडली मालिका
Just Now!
X