23 November 2020

News Flash

“अभिनय पाहून अंगावर शहारे आले”; सोनम कपूरने लंडनच्या थिएटरमध्ये पाहिला चित्रपट

वर्षातील सर्वात मोठा चित्रपट अखेर सिनेमागृहांमध्ये झाला प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी ती ख्रिस्तोफर नोलनच्या ‘टेनेट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित ‘टेनेट’ हा हॉलिवूड चित्रपट अखेर लंडनमधील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया देखील झळकल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे करोनाच्या वाढत्या संक्रमणातही सोनम कपूरने केवळ डिंपल कपाडियांसाठी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन पाहिला.

कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो

“मी आज टेनेट पाहिला. सिनेमागृहामध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा अनुभव काही वेगळाच होता. या चित्रपटात डिंपल कपाडिया यांनी खूप सुंदर अभिनय केला आहे. त्यांचा अभिनय पाहून माझ्या अंगावर शहारे आले. मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा काही वेगळीच असते.” अशा आशयाच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सोनम कपूरने ‘टेनेट’ पाहताना आलेला अनुभव सांगितला.

एकता कपूरची नागिन ठरली ‘खतरों के खिलाडी’ची विजेता; पटकावली ‘मेड ईन इंडिया’ ट्रॉफी

टेनेट हा वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी आहे. ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर हा चित्रपट युरोपमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतातील अनेक मोठ्या कलाकारांनी युरोपमधील सिनेमागृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 1:31 pm

Web Title: sonam kapoor watch tenet in london theater for dimple kapadia mppg 94
Next Stories
1 ‘महेश भट्ट यांची सीबीआय चौकशी का नाही?’; सुचित्रा कृष्णमूर्तीचा सवाल
2 काम सुरु करण्यापूर्वी अभिषेक बच्चनने केला हेअरकट, हृतिकने केली कमेंट
3 “मी सत्याच्या बाजूने उभी”; रियाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीचं ट्रोलर्सला उत्तर
Just Now!
X