अभिनेता सलमान खानच्या उपस्थितीत पुण्यात पार पडलेल्या ‘दबंग टूर’ कार्यक्रमादरम्यान विना परवाना काही गाणी वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद सय्यद या व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सलमानसोबतच कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर प्रभू देवा यांनीदेखील हजेरी लावली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी बालेवाडीच्या क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी यशराज, इरॉस, झी म्युझिक या कंपनीची काही गाणी विना परवाना वाजवण्यात आली होती. फोरपिलर्स इव्हेन्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने गाण्यांचा परवाना घेण्यासाठी नोवेक्स कंपनीला तीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. तीन लाख रुपयांचा धनादेशसुद्धा नोवेक्स कंपनीला देण्यात आला होता. मात्र हा धनादेश न वटल्याने फोरपिलर्स कंपनीने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोरपिलर्स कंपनीचे संचालक समीर दिनेश आणि व्यवस्थापक मनीष यांच्याविरोधात हिंजवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.