सोनू निगम हा सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या मधुर आवाजात या गायकानं आजवर शेकडो गाणी गायली आहे. सोनूच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्याचा एक नवा म्यूझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या आगामी अल्बममधील ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यात सोनूने एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणाला, “माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करु नये अशी माझी इच्छा आहे.”
अवश्य पाहा – ‘राजा हिंदुस्तानी’मधील किसिंग सीन कसा केला शूट? दिग्दर्शकाने सांगितला अजब किस्सा
या गण्याच्या निमित्ताने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे खळबळजनक वक्तव्य केलं. तुझ्या मुलाला देखील गायक होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर सोनू म्हणाला, “नाही, खरं सांगायचं तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन् व्हायचंच असेल तर त्याने भारतात काम करु नये असं वाटतं. तो भारतात राहात नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथंच करिअर करावं असं वाटतं. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडतं. मला वाटतं त्याने आपलं करिअर निवडलं आहे.”
अवश्य पाहा – ‘ढिल्या कपड्यांमुळे मारली होती थोबाडीत’; करिश्माने घटस्फोटित पतीवर केला आरोप
View this post on Instagram
यापूर्वी सोनूने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर देखील टीका केली होती. “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 7:25 pm