News Flash

“महेश भट्ट यांनी मला चप्पल फेकून मारलं”; कंगनाच्या आरोपावर सोनू निगमची प्रतिक्रिया

कंगना रनौतने साधला बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा

अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात जोरदार टीका करत आहे. ती सातत्याने निर्माता महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधत आहे. “महेश भट्ट यांनी माझ्यावर चप्पल फेकून मारली होती”, असा खळबळजनक आरोप कंगनाने केला होता. तिच्या या आरोपांवर गायक सोनू निगम याने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना सातत्याने आरोप करतेय तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेलच, असं मत सोनू निगम याने व्यक्त केलं.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगमने बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंगनाच्या आरोपांवर भाष्य केलं. तो म्हणाला, “कंगनाबाबत माझ्या मनात प्रचंड आदर आहे. ती पाठिमागून नव्हे तर तोंडावर बोलण्यात विश्वास ठेवते. तिच्यासारख्या बोल्ड स्टेप घेण्यासाठी हिंमत लागते. गेल्या काही काळात ती सातत्याने महेश भट्ट यांच्यावर आरोप करत आहे. या आरोपांमध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. घराणेशाहीचा त्रास मला नाही झाला म्हणजे ती अस्तित्वात नाही असा त्याचा अर्थ होत नाही. कंगनाने बॉलिवूडची ही गडद बाजू जगासमोर आणावी यासाठी तिला आमचा पाठिंबा आहे.”

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

 

View this post on Instagram

 

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

यापूर्वी सोनू निगमने नव्या कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला होता. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने नव्या कलाकारांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 6:17 pm

Web Title: sonu nigam on kangana ranauts allegations against mahesh bhatt mppg 94
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; “महेश भट्ट, करण जोहरच्या मॅनेजरची होणार चौकशी”
2 बिग बींचा जलसा झाला कंटेन्मेंट झोन फ्री; मुंबई महापालिकेने उतरवला बोर्ड
3 “…म्हणून ‘दिल बेचारा’वर टीका करु नका”; नवाजुद्दीनची समिक्षकांना भावूक विनंती
Just Now!
X