27 February 2021

News Flash

‘बाळासाहेब ठाकरेंना करायची होती तुमची हत्या’, यावर सोनू निगमने दिली ही प्रतिक्रिया

एका कार्यक्रमात सोनू निगमला यासंबंधी विचारण्यात आलं

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे गायक सोनू निगमचं नाव सध्या चर्चेत आहे. निलेश राणे यांनी बाळासाहेबांनी गायक सोनू निगमच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप केला आहे. नुकतंच एका कार्यक्रमात सोनू निगमला यासंबंधी विचारण्यात आलं. यावेळी सोनू निगमने चेहऱ्यावर आगळे वेगळे भाव आणत पत्रकाराकडे पाहिलं.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकाराने सोनू निगमला निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारलं. यावर सोनू निगमने काही उत्तर दिलं नाही मात्र चेहरा वेडावाकडा करत पत्रकाराकडे पाहिलं आणि एक स्मितहास्य दिलं. सोनू निगमने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे नेमकं त्याचं उत्तर हो होतं की नाही हे समजू शकलं नाही.

‘बाळासाहेब ठाकरेंनी रचला होता सोनू निगमच्या हत्येचा कट’

काय म्हणाले आहेत निलेश राणे –
‘सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन’, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे.

बाळासाहेबांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर कोणा कोणाचे मृत्यू झाले हे सर्व सांगेन. आमच्या नादी लागायचं नाही, आम्हाला राणे म्हणतात, अशा शब्दांत निलेश राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे आरोप केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 2:29 pm

Web Title: sonu nigam reaction on nilesh ranes allegation of balasaheb thackeray tried to kill him
Next Stories
1 पूर्वकल्पना न देता ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमधून तापसीची गच्छंती
2 Video : ‘लकी’मधील ‘कोपचा’ गाण्यावर जितेंद्र यांचा हटके डान्स
3 ‘३८ वर्षानंतर नवऱ्यासोबत डेटवर गेलात, तर हे असं होणारंच’
Just Now!
X