लॉकडाउनमुळे दुबईत अडकलेला बॉलिवूड गायक सोनू निगम गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. या चर्चा त्याने जवळपास ३ वर्षांपूर्वी अजान संबंधी केलेल्या ट्विटमुळे सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर त्याला अटक करण्याची मागणीही सोशल मीडियावर केली जात होती. आता खुद्द सोनू निगमने यावर वक्तव्य केले आहे.

नुकताच सोनू निगमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याला पाठिंबा दिलेल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर अनेकांना त्याच्या विषयी माहिती नसल्याचे त्याने म्हटले आहे. सोनू दुबईमध्ये चित्रपट पाहून वेळ घालवत असल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on

सोनू निगमने २०१७ मध्ये ‘मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते’, असे ट्विट केले होते. तेव्हा त्याच्या या ट्विट वरुन वाद झाला होता. आता पुन्हा तिन वर्षांनंतर या ट्विटचे स्क्रिन शॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तसेच त्याला ट्रोल देखील केले जात होते. अशातच गायक अदनान सामीने सोनूला पाठिंबा देत ट्विट केले होते.

‘सोनू निगम याचा आवाज, त्याची गाणी उत्तमच असतात. तो माझा भाऊ आहे आणि कायम राहिले. सख्या भावाप्रमाणे माझे त्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळे तो कसा आहे मला ठाऊक आहे. तो कायम सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे कृपया त्याला एकट सोडा. सोनू, मी तुझ्यासोबत आहे’, असे ट्विट अदनान सामीने केले होते. त्याच्या या ट्विटनंतर त्याला देखील ट्रोल करण्यात आले.

तीन वर्षांपूर्वी सोनूने ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असे ट्विट केले होते. आता तो दुबईमध्ये आहे आणि आता त्याला अजानच्या आवाजाचा त्रास होत नाही का? असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी त्याला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.