26 February 2021

News Flash

प्रभू देवाच्या ‘तुतक तुतक तुतिया’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित

या टिझरमध्ये प्रभू देवा स्टाईल पाहता येत आहे

सोनू सूद आणि प्रभू देवा यांच्या ‘तुतक तुतक तुतिया’ या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता सिनेमात प्रभू देवा आहे म्हटल्यावर नृत्य हा सिनेमाचा अविभाज्य भाग असणारच. या टिझरमध्येही प्रभू देवा स्टाईल पाहता येत आहे. या टिझरच्या शेवटी सोनू सूद एका वेगळ्या स्टाइलमध्ये पाहायला मिळत आहे. तुतक तुतक तुतिया हा सिनेमा सोनू सूदच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाचे वेगळेपण म्हणजे, सामान्यतः सिनेमाचे पोस्टर आधी प्रदर्शित केले जाते आणि मग सिनेमाचा टिझर लोकांसमोर आणला जातो. पण, ‘तुतक तुतक तुतिया’ने मात्र वेगळा मार्ग धरला. त्यांनी या सिनेमाचा टिझर पोस्टरच्या आधी प्रदर्शित केला.
टिझर प्रदर्शित करण्यावर वाशू भगनानी म्हणाले की, या सिनेमाची सुरुवात याहून चांगली होऊच शकली नसती. ‘तुतक तुतक तुतिया’ या सिनेमाची एनर्जी एका पोस्टरवरुन दाखवणे आमच्यासाठी अशक्य होते. यासाठी आम्ही आधी टिझर प्रदर्शित केला. प्रभू देवा आणि सोनू सूद यांनी याआधीही एकत्र काम केले आहे. दोघांनी देवी या दाक्षिणात्य सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दोघंही डान्स प्लस या स्टार प्लसच्या रिअॅलिटी शोमध्ये गेले होते. या शोमध्ये प्रभू देवाने त्यांचे वडील मुगुर सुंदर यांच्यासोबतही नृत्य केलेले. मुगुर सुंदर यांनी दाक्षिणात्य सिनेमांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
‘तुतक तुतक तुतिया’ या सिनेमात सोनू सूद याच्याबरोबर तमन्ना भाटियाही दिसणार आहे. या टिझरमध्ये सोनूची पिळदार शरीरयष्टी बघायला मिळते आहे. हा सिनेमा ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 3:04 pm

Web Title: sonu sood and prabhu deva starer tutak tutak tutiya teaser out now
Next Stories
1 संजूबाबाकडे अद्यापही चित्रपटांचा दुष्काळ?
2 ट्विंकल माझी थट्टा करणं बंद कर- ऋषी कपूर
3 ‘बाप्पा मी तुझी पूजा करतोय… माझी नरकातली शिक्षा कमी कर’
Just Now!
X