News Flash

‘त्या’ मुलांचं शिक्षण मोफत करा; सोनू सूदची सरकारकडे मागणी

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

बॉलिवूडचा ‘मसिहा’ सोनू सूदने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. सध्याच्या करोना काळात ज्या लहान मुलांच्या आई-वडीलांचा मृत्यू झालाय, त्या मुलांच्या भविष्याबाबत विचार करा, अशी मागणीच सोनू सूदने सरकारकडे या व्हिडीओमधून केलीये.

या व्हिडीओमधून बॉलिवूडचा मसिहा सोनू सून म्हणाला, ” नमस्कार, मी सरकार आणि सगळ्या संस्थांकडे विनंती करतोय…आपण पाहतोय, सध्याच्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकजण आपल्या परिवारातील कोणत्या ना कोणत्या सदस्यांना गमावून बसतोय…लहान  मुलांनी देखील त्यांचे आई-वडील गमावलेत…कुणाची आई या लहानग्यांपासून दूरावली तर कुणाचे वडील…कुणी केवळ ९ वर्षाचा तर कुणी ८-१२ वर्षाची लहान मुलं..या लहान मुला-मुलींचं पुढचं भविष्य काय असेल याचा विचार कायम डोक्यात फिरतोय..”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

यापुढे व्हिडीओमध्ये तो म्हणाला, ” माझी सरकारकडे विनंती आहे की ज्या ज्या मुलांनी करोना काळात आपले आई-वडील गमावलेत , अशा सर्व मुला-मुलींच्या शाळापासून ते कॉलेजपर्यंत मग ते सरकारी शाळा-कॉलेजमध्ये शिकत असो वा खाजगी…त्यांच्या शिक्षण मोफत केलं पाहीजे…जेणेकरून ज्यांनी आपल्या डोक्यावरचं आई-वडीलांच छत्र हरवलंय ते त्यांचं भविष्य सुरक्षित करू शकतील…”. ही विनंती करत असताना जे जे या कार्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी पुढे येऊन पाठिंबा द्यावा, असं आवाहन देखील यावेळी सोनू सूदने केलं.

सोनू सूदने इन्स्टावर शेअर केली फोनची स्क्रीन
याअदोगरही सोनू सूदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तो त्याच्या फोनची स्क्रीन दाखवताना दिसून आला. या व्हिडीओमध्ये कित्येक लोकांनी त्याच्या मदत मागितल्याच्या नोटीफिकेशन्स होत्या. या व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं, ” देशभरातून इतक्या मोठ्या प्रमाणात मदतीच्या विनवण्या येत आहेत…यातील प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यत्न करतोय…कृपया तुम्ही सुद्धा पुढे या.. आणि मदतीचा हातांची खूप गरज आहे…तुम्हाला जितकं शक्य आहे तितकी मदत देण्याचा पर्यंत केला…

‘डान्स दिवाने ३’ शोमध्ये जजच्या खुर्चीवर दिसणार सोनू सूद
लवकरच अभिनेता सोनू सूद ‘डान्स दिवाने ३’ मध्ये जच्या खुर्चीवर दिसणार आहे. माधुरी दिक्षीतच्या जागी आता सोनू सूद स्पर्धकांच्या परफॉर्न्सवर प्रतिक्रीया देऊन खूश करणार आहे. नुकतंच कलर्स टीव्ही ने एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीलंय, ” डान्स दिवाने ३ मध्ये येणारेय…प्रत्येकाचा आशेचा किरण सोनू सूद…”. अभिनेता सोनू सूदला या शोमध्ये पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे…या शोसाठीचं शुटींग आता बंगलोरमध्ये होतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 3:50 pm

Web Title: sonu sood appeals to centre to provide free education to children who lost parents during the pandemic
Next Stories
1 ‘बिग बॉस’ फेम साहिल आनंदच्या घरी नव्या पाहुण्याचे आगम
2 “जणू तुम्ही आताच माकडाचे माणूस झाला आहात”; कंगना रणौत पुन्हा भडकली
3 विद्या बालनने सांगितले बेडरुम सीक्रेट
Just Now!
X