News Flash

“२५ वर्षांपुढील सर्वांना लस उपलब्ध करावी”, सोनू सूदची सरकारकडे मागणी

"सोनू सूद म्हणाला मी विनंती करतो की..."

देशात पुन्हा एकदा करोनाच्या संक्रमाणाचा धोका वाढत चालला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. एकीकडे लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी दरोरोज करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. लसीकरण सुरु झालं असलं तरी अद्याप केवळ 45 वर्षांवरील लोकांना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने 25 वर्षांवरील जनतेसाठीदेखील लस उपलब्ध करून द्यावी अशी सरकारकडे मागणी केली आहे.

सोनू सूदने एक ट्विट करत सरकारला अपील केली आहे. ” मी विनंती करतो की 25 वर्ष आणि त्यावरील जनतेसाठी लसीकरण सुरू करण्यात यावं. रुग्ण संख्या वाढतेय त्यात लहान मुलांनादेखील करोनाची लागण होतेय. त्यामुळे 25 वर्षांवरील जनतेसाठीदेखील लसीकरणाची घोषणा करण्याची वेळ आली आहे. तरुणांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसून येतेय.” अशा आशयाचं ट्विट सोनूने केलं आहे.

सोनू सूदने नुकतीच अमृतसर इथं एका रुग्णालयात करोनाची लस घेतली आहे. यावेळी त्यांने सोशल मीडियावरून माहिती दिली होती. “मी करोनाची लस घेतली आहे. आता माझ्या देशाने करोनाची लस घ्यावी. आज पासून आम्ही संजीवनी नावाचं नवं लसीकरण अभियान सुरू केलं आहे. हे अभियान लोकांमध्ये जनजागृती करेल आणि लसीकरणासाठी प्रोत्साहन देईल.” असं त्याने यावेळी सांगितलं.

देशावर करोनाचं संकट ओढावल्यापासून सोनू सूदने अनेक गरजूंना मदत करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्याचसोबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी देखील त्याने पुढाकार घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 9:03 am

Web Title: sonu sood appeals to government provide corona vaccine above 25 year all kpw 89
Next Stories
1 चित्रपट परिनिरीक्षण अपिलीय लवाद बरखास्त
2 हिरो नं.१ म्हणतो, “आपुन आ गयेला है!”
3 ‘रात्रीस खेळ चाले ३’चे होर्डिंग फक्त रात्रीच दिसतात, पाहा व्हिडीओ
Just Now!
X