News Flash

आईच्या आठवणीमध्ये सोनू सूद झाला भावूक, शेअर केला फोटो

त्याने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली होती. अनेक कामगारांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्याकडे मदत मागितली होती. तसेच अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही त्याने अनेकांना मदत केली आहे. सध्या सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनू सूदने आईसोबतचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सोनू सूदच्या आईचा २१ जुलै मंगळवार रोजी वाढदिवस होता. आईच्या आठवणीमध्ये त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! तू मला ज्या प्रकारे मार्गदर्शन केले तसेच संपूर्ण आयुष्यभर करत रहा. मला तुझ्याशी बोलायची इच्छा आहे. माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला सांगायची इच्छा आहे… पण माझा विश्वास आहे तू जिकडे कुठे आहेस तिकडे तुला माझी आठवण येत असेल. तू मला आयुष्याभर मार्गदर्शन करत रहा..’ असे सोनू सूदने म्हटले आहे.

सोनू सूदची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. बऱ्याच वेळा सोनू सूद त्याच्या आई- वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:26 pm

Web Title: sonu sood become emotional and pays tribute to mother avb 95
Next Stories
1 Video : ‘पास नहीं तो फेल नहीं’; ‘शकुंतला देवी’मधील पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित
2 सुशांतच्या आत्महत्येवर विद्या बालनने दिली प्रतिक्रिया; म्हणाली…
3 Video : ‘सिनेमाने आधार दिला’, सोलापूर ते बर्लिन प्रवासा विषयी सांगतोय अक्षय इंडीकर
Just Now!
X