लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरितांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत ठरला. अनेक गरीब, स्थलांतरित मजुरांना त्याने गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या या कामाचं सर्वच स्तरांतून कौतुक झालं. लोकांची मदत करण्यासाठी सोनू स्वत: ट्विटरवर अनेकांना रिप्लाय देत होता. त्याचसोबत गमतीशीर ट्विट करणाऱ्यांनाही तो तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तर देत चर्चेत राहत होता. नुकतंच एका चाहत्याने मला मालदीवला पोहोचव अशी विनंती सोनूकडे केली. त्यावर त्यानेही भन्नाट उत्तर दिलं आहे.

‘सर मला मालदीवला जायचंय, कृपया मला तिथे पोहोचव’, अशी विनंती एका चाहत्याने ट्विटरवर केली. अर्थात त्या चाहत्याने केलेली ही गंमत होती. त्यामुळे सोनू सूदनेही त्याला मजेशीर उत्तर दिलं. ‘सायकलवर जाशील की रिक्षाने जाशील भाऊ?’, असा गमतीशीर प्रश्न सोनू सूदने त्या चाहत्याला विचारला.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

पाहा फोटो : काजल अगरवाल अडकली लग्नबंधनात

सोनू सूदने केवळ स्थलांतरित मजुरांचीच नाही तर इतर गरजू व्यक्तींचीही सढळ हाताने मदत केली. रिक्षा चालकाच्या शस्त्रक्रियेचा खर्च असो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च असो किंवा मग आणखी काही, मार्च महिन्यापासून सुरु झालेला सोनू सूदचा मदतीचा ओघ अजूनही कायम आहे.