21 October 2020

News Flash

मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढून दे म्हणणाऱ्याला सोनू सूदचे भन्नाट उत्तर

सोनू सूद सध्या अनेकांना ट्विटरद्वारे मदत करताना दिसत आहे.

करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे इतर राज्यांमध्ये अडकलेल्या प्रवासी मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास अभिनेता सोनू सूदने मदत केली. त्याने अनेकांना ट्विटरद्वारे मदत केली. आता देखील लोकं ट्विट करत त्याच्याकडे मदत मागताना दिसत आहेत आणि सोनू सूद देखील त्याला जमेल त्या पद्धतीने त्यांना मदत करत आहे. दरम्यान एका यूजरने सोनू सूदकडे अनोखी मागणी केली असून सोनू सूदने त्याला दिलेल्या रिप्लायची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

एका यूजरने ट्विटमध्ये ‘सोनू सूद सर माझ्या मोबाईलच्या नेटचा स्पीट वाढवण्यासाठी माझी मदत करा’ असे म्हटले होते. सोनू सूदने त्यावर मजेशीर रिप्लाय दिला आहे.

‘तु उद्या सकाळपर्यंत मॅनेज करशील का? आता मी कोणाचा कंप्यूटर फिक्स करण्यात, लग्न जुवळवण्यात, ट्रेनचे तिकिट काढून देण्यात तसेच पाण्याची समस्या सोडवण्यात थोडा व्यग्र आहे. लोकांनी मला खूप महत्त्वाची कामे दिली आहेत’ असे सोनू सूदने रिप्लाय देत म्हटले आहे.

सोनू सूद सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना मदत करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एका गरीब शेतकऱ्याला ट्रॅक्टर भेट म्हणून दिला होता. तसेच नोकरी गेल्यामुळे भाजी विकणाऱ्या मुलीला नोकरी मिळवून दिली होती. तर दुसरीकडे एका मुलाला यूपीएससी परिक्षेसाठी काही पुस्तके दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 1:06 pm

Web Title: sonu sood interesting reply to user asking to increase internet speed avb 95
Next Stories
1 ‘कसौटी जिंदगी की 2’ सोडण्यावर करण सिंह ग्रोवर म्हणाला…
2 सलमान खानने गायलं देशभक्तीपर गीत; व्हिडीओ होतोय व्हायरल
3 “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”; वाचा स्वातंत्र्यदिनावर गाजलेले शेर
Just Now!
X