जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोशल मीडियावर लाठ्या-काठ्या सफाईदारपणे फिरवणाऱ्या आजीबाईंचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काठ्यांचा खेळ सादर करणाऱ्या या आजींचा व्हिडिओ अगदी अभिनेता रितेश देशमुखनेही शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता सोनू सूदने या आजीबाईंना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनूने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दिलेला शब्द खरा करुन दाखवला असून त्याने आजीबाईंच्या मदतीसाठी मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणारे प्रशिक्षण वर्ग सुरु करुन दिले आहेत.

सेलिब्रिटी फोटोग्राफ्र असणाऱ्या मानव मंगलानीने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ८५ वर्षीय शांताबाई पवार या सोनू सूदचे आभार मानताना दिसत आहे. या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये, “गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनू सूद ने वॉरियर आजी शांताबाई पवार यांच्यासाठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण वर्ग सुरु केलं आहे. या आजींचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. प्रवाशांसाठी देवदूत झालेल्या सोनूने या आजींनी इतर महिला आणि लहान मुलांना सेल्फ डिफेन्सचे धडे द्यावे या उद्देशाने हे प्रशिक्षण वर्ग सुरु केलं आहे,” असं म्हटलं आहे.

salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
maharashtrachi hasya jatra fame gaurav more went to cheer mumbai indians
मुंबई इंडियन्सच्या मॅचला पोहोचला हास्यजत्रा फेम गौरव मोरे! फिल्टरपाड्याच्या बच्चनला पाहून नेटकरी म्हणाले, “दादा आज…”
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

या पोस्टमध्ये पुढे दिलेल्या माहितीनुसार सोनू सूदचे आभार मानण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचे नाव सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल असं ठेवण्यात आलं आहे. आपण या प्रशिक्षण वर्गाला लवकरच भेट देऊ असा शब्दही सोनूने दिला आहे.

सोनूने सुरु केलेल्या या प्रशिक्षण वर्गाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी इन्स्टाग्रामवरुन सोनूचे कौतुक केलं असून त्याच्यामुळे आजींना मदत होण्याबरोबरच महिलांना स्वत:च्या संरक्षणाचे धडे घेता येणार असल्याने आनंद द्विगुणीत झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

व्हिडिओ समोर आला तेव्हा काय म्हणालेला सोनू?

‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का? त्यांच्यासोबत एक छोटी प्रशिक्षण शाळा उघडायची आहे जिथे त्या आपल्या देशातील महिलांना स्वयंरक्षणासाठी काही गोष्टी शिकवू शकतील’, असं ट्विट सोनू सूदने केलं आहे. करोना संकटाच्या काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी या आजीबाईंना लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका मुलाखतीमध्ये, “मी आठ वर्षांची असताना आई वडिलांनी मला ही कला शिकवली. ती मी अजून विसरली नाही. मी शाळांमध्ये मुलांसमोर कार्यक्रम केले आहेत. परंतु नातवांनी या खेळात येऊ नये अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना शिक्षण द्यायचं आहे. मी घराबाहेर पडले तरच माझ्या मुलांचं पोट भरेल”, अशी व्यथा या आजीबाईंनी बोलून दाखवली होती.