News Flash

शेफ सोनू सूद: अॅक्टर बनायचं असेल तर शिका ‘ही’ गोष्ट!

सोनूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

अभिनेता सोनू सूद कायमच ह्या ना त्या कारणाने चर्चेत असतो. कधी तो लोकांना मदत करत असतो, तर कधी एखाद्या महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यावर भाष्य करत असतो. आताही तो चर्चेत आला आहे त्याच्या एका व्हिडिओमुळे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडला आहे. या व्हिडिओत चाहत्यांना सोनूचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे.

सोनूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो डोसा बनवताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओला ‘डोसा टाईम’ असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, “तुम्ही खूप डोसा खाल्ला असेल पण हा भारतातला सर्वात चांगला डोसा आहे. खायला तयार व्हा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

चित्रीकरणाच्या सेटवर सोनू डोसा बनवत आहे. तो म्हणतो, “ज्या कलाकाराला डोसा बनवता येतो त्याला निर्माते पसंती देतात. कारण मग त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च वाचतो. कलाकार स्वतःच स्वतःसाठी बनवेल आणि खाईल. त्यामुळे जे ऍक्टर होऊ इच्छितात, त्यांनी स्वतःसाठी डोसा बनवायला शिकावं.”

त्याच्या या व्हिडिओने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रत्येकजण त्याचं कौतुक करत आहे. अनेकजण त्याला ऑलराऊंडरही म्हणत आहेत. तर काहींनी त्याने ऑफलाईन परिक्षांबाबत आवाज उठवल्याने त्याचं कौतुकही केलं आहे.

आणखी वाचाः विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदचा पुढाकार; व्हिडिओ शेअर करत म्हणाला,”…”

दिग्दर्शक फराह खानने तर सोनूला थेट आपल्या घरी बोलावलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना ती म्हणते, “ये मग घरी.”

फारच कमी वेळात सोनूच्या या व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 12:02 pm

Web Title: sonu sood making dosa video viral vsk 98
Next Stories
1 अमिताभ यांच्या ‘या’ सल्ल्यानंतर अभिषकने बदलला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय
2 BAFTA 2021: इरफान खान आणि ऋषी कपूर यांना आदरांजली; चाहते झाले भावूक
3 ‘तू तर नाकात गातोस, कोण ऐकतं तुला’, असे म्हणणाऱ्याला महेश काळेंचे सडेतोड उत्तर
Just Now!
X