करोना विषाणूचं वाढतं संक्रमण आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तो मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देत आहे. पण त्याचबरोबर आता तो स्थलांतरीत मजुरांना घर देखील देणार आहे.

अवश्य पाहा – सेम टू सेम; हुबेहुब WWE सुपरस्टार्ससारखे दिसतात हे सेलिब्रिटी

“२० हजार स्थलांतरीत मजुरांना घर देताना मला खूप आनंद होत आहे. या मंडळींना प्रवासी रोजगाराच्या माध्यमातून नोएडा कपडा युनिटमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. NAEC चे अध्यक्ष ललित ठुकराल यांच्या मदतीने आम्ही हे कार्य सुरु केलं आहे.” अशा आशयाची पोस्ट करुन सोनू सूदने आपल्या या नव्या कार्याची माहिती चाहत्यांना दिली. या मदतीसाठी सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तारक मेहतामध्ये ‘या’ ग्लॅमरस अभिनेत्रीची एण्ट्री; साकारणार अंजली भाभीची भूमिका

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.