09 March 2021

News Flash

सोनू सूदची आसाममधील ‘त्या’ महिलेला रक्षाबंधनाची खास भेट

पाहा, सोनूने नेमकी कोणत्या स्वरुपात केली मदत

करोना विषाणूमुळे सध्या देशात लॉकडाउनचा काळ सुरु आहे. मात्र या काळातही प्रत्येक जण आपआपल्या घरी राहून शक्य होईल त्यानुसार हा दिवस खास करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच अभिनेता सोनू सूदनेदेखील एका गरजू महिलेला रक्षाबंधनचं खास गिफ्ट दिलं आहे. विशेष म्हणजे सोनू पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनूने एका गरजू महिलेला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं आहे. ट्विटरवर सोनल सिंग या युजरने सोनूला टॅग करत एका महिलेची आर्थिक परिस्थितीमुळे झालेली अवस्था व्हिडीओच्या माध्यमातून दाखविली होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोनूने रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून नवीन घर बांधून देईन असं म्हटलं आहे.

सोनू सूद सर हे कुटुंब आसाममधील जलपयीगुडी येथील आहे. या महिलेच्या पतीचं निधन झालं असून या महिलेला एक लहान मुलगा आहे. या मुलाचं पोट भरण्यासाठीही या महिलेकडे काहीच नाही. तसंच पावसाळ्यात या स्त्रीचे अत्यंत हाल होतात. त्यामुळे तुम्हीच एक आशेचा किरण आहात. शक्य असल्याच या कुटुंबाला मदत करा, असं सोनल सिंगने सोनूला टॅग करत म्हटलं होतं.

हे ट्विट पाहिल्यानंतर चला आज रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी आसाममधील आपल्या बहिणीसाठी नवीन घर बांधुयात, असं रिट्विट सोनू सूदने केलं आहे. विशेष म्हणजे सोनूच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तसंच अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 3:55 pm

Web Title: sonu sood pledges support to woman whose home was ravaged by rains raksha bandhan special gift ssj 93
Next Stories
1 सुशांतच्या एक्स मॅनेजरच्या पार्टीत राजकीय नेते उपस्थित होते का? मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले..
2 प्रियांकाच्या ‘या’ ड्रेसची किंमत माहित आहे का?
3 तारक मेहता मधल्या बाबुजींचा स्वॅग पाहिलात का??
Just Now!
X