News Flash

“यापुढे फक्त नायकच साकारणार”; सोनू सूदने नाकारल्या खलनायकांच्या भूमिका

सोनू सूद यापुढे खलनायकाच्या भूमिका साकारणार नाही; कारण...

करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. या समाजसेवेचा सोनूच्या वैयक्तीक आयुष्यावर देखील फार प्रभाव पडला आहे. परिणामी त्याने यापुढे चित्रपटांमध्ये खलनायकांच्या भूमिका साकारण्यास साफ नकार दिला आहे.

अवश्य पाहा – “पाकिस्ताननं चोरी केली”; ‘साराभाई वर्सेस साराभाई’ची नक्कल पाहून निर्माता संतापले

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार सध्या सोनू सूदला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत आहेत. परंतु बहुतांश चित्रपटांमध्ये त्याला खलनायकांचेच रोल साकारण्याची विनंती केली जात होती. त्यामुळे या सर्व चित्रपटांना त्याने नकार दिला आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने गरीबांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांचा त्याने फार जवळून अनुभव घेतला. या अनुभवामुळे लोकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींबाबत त्याच्या मनात घृणा उत्पन्न झाली आहे. त्यामुळे चित्रपटात देखील आता तो खलनायकाच्या रुपात झळकून कोणाला त्रास देऊ शकत नाही. परिणामी यापुढे केवळ नायकांच्याच भूमिका साकारण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

अवश्य पाहा – हॉट आणि ब्युटीफूल… नुशरतच्या बिकिनी लूकबरोबरच टॅटूवरही चाहते झाले फिदा

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवलं आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. यापूर्वी सोनुने १५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:20 pm

Web Title: sonu sood says no more villainous roles in movies mppg 94
Next Stories
1 ‘आता मी असं बसू शकत नाही पण..’; गरोदर अनुष्काची भन्नाट पोस्ट
2 भन्साळींच्या चित्रपटातून उलगडणार लाहोरच्या रेड लाईट एरियाचं सत्य?
3 अक्षयची प्रशंसा करत चित्रपट प्रदर्शकाने दिला इतर कलाकारांना सल्ला, अभिषेक म्हणाला…
Just Now!
X