News Flash

“पुन्हा नक्की परत या…”; सोनू सूदने उत्तर भारतीय मजुरांना निरोप देताना घातली साद

सोनूने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ट्विटरवर त्याचा फोन नंबर शेअर केला आहे

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद चर्चेत आहे. या चर्चा त्याने लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन उत्तर भारतातील मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सोनू सूदचा आणखी एक किस्सा आता चर्चेत आला आहे. उत्तर भारतीय मजुरांना घरी पाठवताना त्यांनं चौकशी करत पुन्हा परत येणार का? असा प्रश्नही विचारला.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी सोनू सूद मजुरांना बसमध्ये बसवण्यासाठी बस स्थानकाजवळ गेला होता. त्यावेळी सोनू सूदने बसमधील मजुरांशी संवाद साधला. सुरूवातीला त्याने मजुरांची चौकशी केली. नंतर त्या बसमध्ये बसलेल्या सर्वांना मास्क लावण्यास सांगितलं. तसेच बसमध्ये पिण्याचे पाणी आणि खाण्याची सोय केली असल्याचे सांगत निरोप दिला. यावेळी त्याने सर्व काही ठिक झाल्यानंतर पुन्हा येणार ना? असा प्रश्नही विचारला.

सोनूने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ट्विटरवर त्याचा फोन नंबर शेअर केला. दिलेल्या नंबरवर त्याने मजुरांना त्यांना कुठे जायचे आहे, ते कुठे अडकले आहेत, एकूण किती लोक आहेत ही सर्व माहिती देण्यास सांगितली होती. पडद्यावरील खलनायक आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात अनेकांसाठी सुपरहिरो ठरला असल्याचे म्हटले जाते. तो करत असलेल्या कामाची सर्वजण प्रशंसा करत आहेत.

आधी सोनूने डॉक्टरांना आराम करण्यासाठी स्वत:चे हॉटेल खुले केले होते. तसेच त्याने पीपीई किट्सची देखील मदत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 8:04 pm

Web Title: sonu sood sends off more migrants home asks them to wear masks says wapas aana zaroor avb 95
Next Stories
1 विक्रम गोखले यांचे औदार्य; कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी दिली जागा
2 लॉकडाउनमध्ये घरगुती हिंसेवर डॉक्टर डॉन सांगतोय त्याचा फंडा !!
3 झोया मोरानीने केले दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेशन
Just Now!
X