News Flash

सोनू सूद बरा झाला….करोना अहवाल आला निगेटिव्ह!

अनेक चाहते त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत होते.

बॉलिवूड स्टार सोनू सूदला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याचे अनेक चाहते तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. आता तो करोनातून बरा झाला असून त्याचा करोना अहवालही निगेटिव्ह आला आहे.

त्याने आज इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल पोस्ट केली आहे. यात त्याने आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मास्क परिधान केला आहे. तसंच हाताने निगेटिव्ह साईन करत पोझ केलं आहे. त्याने या फोटोला ‘करोना अहवाल निगेटिव्ह आला’ असं कॅप्शनही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूद या करोनाच्या काळात लोकांचा खरा हिरो बनला आहे. त्याने या काळात अनेकांना मदत केली आहे. मजुरांना त्याने घरी जाण्यासाठी मदत केली. अनेकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अजूनही तो अनेकांना मदत करत आहे. त्याने आत्तापर्यंत अनेकांना रुग्णांना बेड उपलब्ध करुन दिला आहे. तो सध्या पंजाबमधील लसीकरणासाठीचा ब्रँड अम्बॅसिडरही आहे.

सोनूने आपल्याला करोनाची लागण झाल्याची बातमीही अनोख्या अंदाजात सांगितली होती. ‘कोविड पॉझिटिव्ह …मूड आणि स्पिरीट- सुपर पॉझिटिव्ह’ या वाक्याने त्याने आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे. यात तो म्हणतो ,”मी सगळी काळजी घेत आहे आणि गृहविलगीकरणात आहे. पण काळजी करु नका, यामुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आणखी वेळ मिळत आहे. लक्षात ठेवा मी सदैव तुमच्यासोबत आहे”. सोनूच्या या पोस्टने त्याच्या चाहत्यांचं मन जिंकून घेतलं. त्याच्या अनेक चाहत्यांनी तो बरा व्हावा म्हणून प्रार्थनाही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 6:40 pm

Web Title: sonu sood tested negative for coronavirus shared news on instagram vsk 98
Next Stories
1 वामिकाला समर्पित केलं पहिलं अर्धशतक अन् अनुष्काला दिलं फ्लाईंग कीस!
2 ‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैनाला करोनाची लागण, रुग्णालयात केलं दाखल
3 सलमान खानच्या ‘राधे’ वर सोशल मीडियावर बहिष्कार; ट्रेलर पाहून सुशांतचे चाहते भडकले
Just Now!
X