30 September 2020

News Flash

‘इज्जत कमावण्यासाठी…’, सोनू सूदच्या ट्विटवर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

त्याचे हे ट्विट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो कधी गरीबांना मदत करतो तर कधी यूजर्सला भन्नाट रिप्लाय देताना दिसतो. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात अनेक प्रवासी मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली. त्यानंतर सोनू सूदने अनेक गरीबांनादेखील सोशल मीडियाद्वारे मदत केली. आता सोनू सूदने केलेल्या ट्विटमुळे तो चर्चेत आहे. तसेच त्याच्या या ट्विटला स्वरा भास्करने देखील रिप्लाय दिला आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्स आणि घराणेशाही हा वाद सुरु आहे. अनेक कलाकारांनी त्यांची मते मांडली आहेत. त्यानंतर सोनू सूदने कोणाचेही नाव न घेता ‘इज्जत कमावण्यासाठी निघा. लोकप्रिय होण्यासाठी नाही. लोकप्रिय तर अनेक लोकं आहेत. जे कधी इज्जत कमावू शकले नाहीत’ या आशयाचे ट्विट केले आहे.

सोनू सूदच्या या ट्विटवर अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर दिले आहे. स्वराने टाळ्या वाजवणारे इमोजी वापरले आहेत. यावरुन तिला सोनू सूदचे म्हणणे पटले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच सोनू सूदच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने तर हा कंगनाला अप्रत्यक्ष टोला असल्याचे म्हटले आहे.

सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात विविध ठिकाणी अडकलेल्या देशभरातील शेकडो मजुरांना आणि विद्यार्थ्यांना बस आणि ट्रेनच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले आहे. शिवाय त्यांच्या रोजगारासाठीही तो प्रयत्न करत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका यूजरने प्लेस्टेशन मागितले होते. सोनू सूदने त्याला प्लेस्टेशन न देता पुस्तके देऊन मदत केली होती. तसेच त्याने एका गरीब शेतकऱ्याला ट्र्रॅक्टर भेट म्हणून दिली होता. तर करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नोकरी गेल्यामुळे भाजी विकणाऱ्या मुलीला मदत केली होती. तिला नवी नोकरी मिळवून दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 2:28 pm

Web Title: sonu sood tweet about earning respect swara bhasker reacted on it avb 95
Next Stories
1 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्याचे निधन
2 रिया ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने रकुलप्रीतची कोर्टात धाव, केली ‘ही’ मागणी
3 “माझ्या बायोपिकमध्ये भूमिका साकारायची असेल तर..”; सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला
Just Now!
X