करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मजुरांचे हाल होत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. शहरांमध्ये अडकलेल्या मजुरांना तो त्यांच्या गावी नेऊन सोडत आहे. दरम्यान भारताच्या सिमेवर तैनात असलेल्या चीनी सैनिकांना देखील त्याने चीनमध्ये नेऊन सोडावे अशी विनंती एका नेटकऱ्याने केली. यावर सोनूने देखील गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.
हा व्हिडीओ पाहाच – महाभारत, रामायण खरंच घडलं होतं का?
काय म्हणाला सोनू सूद?
“लडाखमध्ये चीनचे सैनिक तैनात आहेत, त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवा.” अशी विनंती सोनू सूदला एका नेटकऱ्याने केली. या विनंतीवर सोनू म्हणाला, “त्या चीनी लोकांना माझ्या डिटेल्स पाठवा.” करोना विषाणूमुळे सध्या भारत आणि चीनमध्ये काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोनू सूदचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अवश्य पाहा – “आता कुटुंबियांना भेटण्याची वेळ आली”; सोनू सूद करतोय आसाममधील लोकांची मदत
Chinese लोगों को डिटेल्ज़ भेजो https://t.co/66huPWsRaL
— sonu sood (@SonuSood) June 9, 2020
सोनूने सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 12:38 pm