04 July 2020

News Flash

काहीजण माझ्या नावाने पैसे उकळतायेत, सोनू सूदने शेअर केले स्क्रिन शॉट

त्याने कोणावरही विश्वास न ठेवण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे.

गेल्या काही दिवासांपूर्वी सोनू सूद अनेक मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत करत आहे. त्यासाठी त्याने आणि त्याच्या संपूर्ण टीमने ट्विटरवर त्याचा फोन नंबर शेअर केला होता. पण सोनू सूदच्या नावाने आता कामगारांची फसवणूक होत असल्याचा खुलासा खुद्द सोनू सूदने केला आहे.

नुकताच सोनू सूदने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही लोकांच्या मेसेजचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. या स्क्रिनशॉटमध्ये त्याच्या नावाने प्रवासी मजुरांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. हे स्क्रिनशॉट शेअर करत सोनू सूदने अशा लोकांवर विश्वास ठेवू नको.. मी कोणालाही घरी पोहोचवण्यासाठी पैसे घेत नाही असे त्याने म्हटले आहे.

‘मित्रांनो, काही लोक तुमच्यावर ओढावलेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधत आहेत. मी आणि माझी संपूर्ण टीम कामगारांना पोहोचवत असलेली सुविधा नि:शुल्क आहे. जर एखादी व्यक्ती माझे नाव घेऊन पैसे मागत असेल तर त्यांना नकार द्या. तसेच या गोष्टीची माहिती मला किंवा जवळपासच्या पोलिसांना द्या’ असे त्याने सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्याने फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे स्किनशॉट देखील शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 2:17 pm

Web Title: sonu sood warn migrant workers about fraud on his name avb 95
Next Stories
1 देव या संकल्पनेचा आधुनिक दृष्टीकोन उलगडणार देवदत्त पटनायक लोकसत्ता डिजिटल अड्डावर
2 अक्षय कुमारने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव
3 Video : धनंजय माने इथेच राहतात का?? सिद्धार्थ जाधव आणि मित्रांची बनवाबनवी
Just Now!
X