25 February 2021

News Flash

सोनू सूदच्या मदतकार्यात पत्नीचाही मोलाचा वाटा

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो असं म्हणतात. ही ओळ अभिनेता सोनू सूदसाठीही तंतोतंत लागू होते.

सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली सूद

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा खंबीर पाठिंबा असतो असं म्हणतात. ही ओळ अभिनेता सोनू सूदसाठीही तंतोतंत लागू होते. सध्या सर्वसामान्यांसाठी हिरो ठरलेल्या सोनू सूदसोबत त्याची पत्नी सोनालीसुद्धा दिवसरात्र मेहनत करतेय. लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित गरीब मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी बस, ट्रेन, विमानाची व्यवस्था सोनू सूद करत आहे. त्याच्या या कामात त्याची पत्नी पुरेपूर मदत करत असून अनेक मुलाखतींमध्ये सोनूने हे बोलून दाखवलं आहे.

अभिनेता होण्यापूर्वी शिक्षण घेत असतानाच सोनूची सोनालीशी पहिली भेट झाली. नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना सोनू सोनालीच्या प्रेमात पडला. त्यावेळी सोनालीसुद्धा नागपूरमध्ये एमबीएचं शिक्षण घेत होती. सोनाली तेलुगू भाषिक असून प्रसारमाध्यमे, इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून लांबच राहणं पसंत करते. २० हून अधिक वर्षांपासून ही जोडी एकत्र असून एकमेकांच्या सुखदु:खात खंबीरपणे पाठिशी उभे राहतात. सोनाली हेच सोनू सूदचं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलं जातं.

आणखी वाचा : सोनू सूदची एकूण संपत्ती माहितीये का?

पडद्यावर खलनायकी भूमिका साकारणारा सोनू सूद त्याच्या मदतकार्यामुळे खऱ्या आयुष्यात हिरो ठरला आहे. दिवसभरात त्याने अनेक स्थलांतरितांचे मेसेज, फोन कॉल्स येत असतात. त्यांना उत्तर देणं, त्यांच्याकडून संपर्क क्रमांक, पत्ता या सगळ्या गोष्टी लिहून घेण्याचं काम सोनाली करते. सोनूच्या या मदतकार्यात सोनालीचाही तितकाच मोठा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 10:32 pm

Web Title: sonu sood wife helping him in his work know their love story ssv 92
Next Stories
1 “नवाजुद्दीनबद्दल अजून बरंच काही उघड व्हायचंय”; पुतणीच्या तक्रारीनंतर पत्नीची प्रतिक्रिया
2 “माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय”, सुबोध भावे संतापला
3 लॉकडाउनमध्ये विशेष परवानगी घेऊन शूट केलेली अक्षय कुमारची जाहिरात पाहिलीत का?
Just Now!
X